IHRA News

IHRA Live News

देशरक्षणासाठी सीमेवर जीवाची बाजी लावून काम करणार्या जवानांचा सर्वांनी सन्मान केला पाहीजे:अा.शशिकांत शिंदे

देशरक्षणासाठी सीमेवर जीवाची बाजी लावून काम करणार्या जवानांचा सर्वांनी सन्मान केला पाहीजे:अा.शशिकांत शिंदे

कदिरमणेर/जावळी प्रतिनिधी,

‘रेवडी’ ता.कोरेगाव येथील फौजी श्री. रमेश बाबा मोरे हे नुकतेच सैन्यदलातून निवृत्त झाले, त्यांच्या प्रामाणिक देशसेवेबद्दल करण्यात आलेल्या सपत्नीक सत्कार समारंभास विधान परिषद अा.शशिकांत शिंदे उपस्थित होते.

देशरक्षणासाठी सीमेवर जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. आज रमेश मोरे फौजींचा सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहे असे यावेळी अा.शिंदे यांनी अापल्या प्रेमभावना बोलून दाखविल्या. अाणि फौजींना पुढील आयुष्य आनंदाचे व सुखदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष श्री. नितिन लक्ष्मणराव पाटील, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!