IHRA News

IHRA Live News

सातारा लावण्यवती दुबईमधे

सातारा जिल्ह्यातील कुडाळची लावण्यावती दुबई येथे पारंपारिक लावणी सादरीकरण करणार. जावळी प्रतिनिधी सुनिल भोसले दि. 20 सातारा जिल्ह्यातील कुडाळ ( इंदिरानगर ) गावातील पारंपारिक लावणी जतन करणाऱ्या पूनम कुडाळकर त्याचबरोबर ढोलकी पटू नितीन प्रधान हे कलावंत व त्यांच्या बरोबर सह कलावंत दुबई येथे होणाऱ्या दिनांक 18 ते 23 नोव्हेंबर 20 ते 21 दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड एक्स प्रो या जागतिक प्रदर्शनामध्ये आपली कला सादर करणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभाग तसेच मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदि लोककलेचे अभ्यासक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोंधळी गीत शाहिरी पोवाडे आदी पारंपारिक लोककला सादर होणार आहे. शाहिरी च्या संयुक्त विद्यमाने होत आहे. पूनम कुडाळकर यांनी अकलूज लावणी स्पर्धेमध्ये सलग 9 वर्ष प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला आहे. पारंपारिक लावणी जतन करण्याची इच्छा मनात बाळगून पूनम कुडाळने लावणी विश्वात पाऊल ठेवले आहे. फिल्मी लावणी ची अदा ही पूनम उत्तम रित्या सादर करते नवीन पिढीतील लावणी अदाकारा म्हणून पूनम सोशल मीडिया वर खूप फेमस आहे. तिचे लाखो फॅन फॉलोवर आहे. नाचून गाऊन आदकारी करणे ही पूनम ची खासियत आहे. ती या क्षेत्रामध्ये आपल्या आई-वडिलांना आपले गुरु मानते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला योगेश देशमुख निर्मित तुमच्यासाठी काय पण हा लावणीप्रधान कार्यक्रम पूनम कुडाळकर यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. ही पूनम आपल्या सातारा जिल्ह्यातील कन्या आहे. भारताला स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे दिल्ली येथे भारत सरकारने कथ्थक व लावणीची जुगलबंदी सादरीकरणासाठी पूनम यांना आमंत्रित केले होते. पूनम यांना 2017 चा बालगंधर्व युवा लावणीसम्राज्ञी पुरस्कार मिळाला आहे. अनेक लावणी महोत्सव गाजवत असताना त्यांना यावर्षीचा पुणे नवरात्र महोत्सव वाचा लक्ष्मीमाता पुरस्कार. देऊन गौरविण्यात आले आहे.

0Shares
error: Content is protected !!