IHRA News

IHRA Live News

सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे कडुन रिश्ते गाईड डॉट कॉम साईटचे माध्यमातुन बनावट प्रोफाईल तयार करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

 वर्धा 2:- (प्रतिनिधी) दिपाली  चौहान 

सूत्रांकडून माहिती प्राप्त फिर्यादी यांच्या नावाची रिश्ते गाईड डॉट कॉम साईटवर बनावटी प्रोफाईल बनवून त्यामध्ये चुकीची माहिती भरुन ती प्रोफाईल नमूद साइटवर अपलोड केली व फिर्यादीची बदनामी करुन फसवणुक केल्याचे तक्रारीवरुन दिनांक ०१-०७-२०२२ रोजी पो.स्टे. रामनगर येथे माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची सायबर सेलद्वारे तात्काळ दखल घेवून तांत्रिक माहिती काढून माहिती प्रमाणे पो.स्टे. रामनगर हद्दीत गौरक्षण वार्ड, वर्धा येथे अग्रवाल यांचे घरी भाड्याने सुरु असलेल्या रिश्ते गाईड डॉट कॉम या विवाह संस्थेवर छापा टाकला असता आरोपी १) तुषार दिलीप कोल्हे, वय २४ वर्ष, रा. प्लाँट नं. ५४, स्नेहनगर, छत्रपती चौक, नागपुर याने श्रीमती रुचीका दादाराव खोब्रागडे, वय २४ वर्ष, रा. आमगाव जंगली, ता. सेलु, जि. वर्धा हिचे सोबत संगणमताने रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायसी घेवुन सोशल प्लॅटफॉर्मचे माध्यमातुन मुला-मुलींचे फोटो व वैयक्तीक माहितीची चोरी करुन त्यांची बनावट प्रोफाईल तयार करतात. प्रोफाईलमध्ये बनावट मोबाईल क्रमांक टाकुन अपलोड करतात. ज्या ग्राहकाला पसंती आली त्यांना खोटी माहिती पुरवुन स्वत:चे फायद्याकरीता त्यांचे कडुन पैसे उकळतात. सदर कॉल सेंटरचे भरपुर ग्राहक असुन मोबाईल फोनव्दारे माहीतीची देवाण घेवाण करणे करिता ६ महिला कामाला ठेवुन लग्न जुळवून देतो असे भासवुन लोकांची आर्थिक फसवणुक तसेच बनावटी प्रोफाईल तयार करुन बदनामी केलेली असल्याने आरोपींचे ताब्यातुन पुष्कळ साहित्य जप्त केले आहे

बनावटी कॉल सेंटर चालविण्याकरीता लागणारे पोलिसांनी जप्त केलेले एकूण साहित्य

जप्त केलेले साहित्य

१) ७ साधे मोबाईल, २) ४ एन्ड्राईड मोबाईल, ३) नगदी ३८,४९०/- रु., ४) चार संगणक संच, ५) मोबाईल चार्जर, ६) एकुण २१ रजिस्टर, ७) बँकेचे चेकबुक व इतर साहित्य असा एकुण जु.कि. १,८३,०४०/- रु. चा माल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. श्री महेंद्र इंगळे, पोउपनि. अमोल लगड, पोउपनि. बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, निलेश कट्टोजवार, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, रितेश शर्मा, राजु जयसिंगपुरे, अंकित जिभे, महिला पोलीस अंमलदार शाहिन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बनावटी कॉल सेंटरवर छापा घालुन १,८३,०४०/- रु. चा माल जप्त करून आरोपींना अटक केले आहे. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.

0Shares
error: Content is protected !!