कदिर मणेर/जावळी प्रतिनिधी कुडाळ:मेढा हे तालुक्याचे ठिकाण अाहे येथे सरकारी कार्यालय, तहसिलदार,पोलिस स्टेशन,कोर्ट,एसटी अागार,काॅलेज अाहेत येथे जाण्यासाठी व पाचगणी,महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच पाचवड मार्गे हायवे ला पुणे,मुंबई,कराड कोल्हापुर कडे जाण्यासाठी या भागातील प्रवास करणार्यांना कुडाळ शहरातूनच जावे लागते.शालेय मुला मुलींना देखील मेढा,पाचवड,पांचगणी येथील काॅलेजला जावे लागते.कुडाळ बाजारपेठे मध्ये बर्याच वर्षापासून तरकारी,फुले,फळे,बांगडी,सुखे मासे विकणारे विक्रेते ही रस्त्याच्या कडेला उन्हापासून बचाव करण्यासाठी पाल ठोकुन व्यवसाय करायचे परंतू २०२० या वर्षी विक्रेत्यांना त्याच जागेवर व्यापारी गाळे बांधून देण्यात अाले.हे गाळे बांधत असताना बाजारपेठेतील जुने एसटी स्टॅंड देखील पाडण्यात अाले होते ते नव्याने उभारण्यात अाले.स्टॅंडच्या दोन्ही बाजूला एसटी कॅन्टींग रुम व दुसरीकडे एसटी कंटो्ल रुम बांधण्यात अाली.एसटी स्टॅंडच्या दोन्ही बाजूने व्यापारी गाळे पुर्ण झाले तसेच एसटी स्टॅंड देखील झाले परंतू कंटो्ल रुमला दरवाजे खिडक्या नसल्यामुळे एसटी कंटो्लर कर्मचार्याला तातपुरती व्यवस्था म्हणून एसटी स्टॅंडच्या मागील बाजूस असणार्या गाळ्यामध्ये जागा दिली अाहे.ग्रामिण भागातील प्रवासी कुडाळ या ठिकाणी जेव्हा येतात गाड्याच्या वेळा किंवा गाडी अाली किंवा गेली हे त्यांना विचारण्यासाठी खुप कसरत करावी लागत अाहे.यामध्ये सुशिक्षित,अशिक्षित तर काही वयस्कर माणसे देखील असतात.मागच्या बाजूला गाळा असल्यामुळे बिच्यार्या कर्मचार्याला पुढे काय घडत अाहे याची कल्पना देखील नसते शालेय मुला,मुलींचे देखील एसटी पाससाठी खुप हाल होत अाहेत.जेथे एसटी कर्मचारी बसलेला असतो त्या गाळ्यामध्ये पाहणी केली असता असे दिसून येत अाहे की पावसाळा चालू झाल्यानंतर पावसाचे पाणी अात येवून आत असणारी कागदपत्रे पुर्ण भिजून जातील.प्रवास करणार्या तसेच शाळेत जाणार्या मुलांचे होणारे हाल,एसटी कर्मचार्याची होणारी धावपळ यावर पावसाळा चालू होण्यापुर्वी मेढा (एसटी) आगार अाणि गावातील पुढारी यांनी बसुन तोडगा काढावा अाणि एसटी स्टॅंडमधील बांधलेल्या रुमला दरवाजे,खिडक्या बसवून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे.अशी अपेक्षा प्रवाशी अाणि गावातील नागरिकांमधून देखील होत अाहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ