IHRA News

IHRA Live News

झानेश्वरी यशोगाथा

🚩 *ठाणे, श्री सचिन शिंदे*
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *विभूती योग*
🚩 *अध्याय दहावा*
🚩 *ओवी ५१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌷घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे ।ऐसेंचि होतसे॥५१॥*
   घागरीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले. गळ्यापर्यंत भरले नाही, तर ती आणखी भरावी त्याप्रमाणे मी थोडे निरूपण करून तुला श्रवण करवून पाहले, तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले.
*🍀अवचितयावरी सर्वस्व सांडिजे ।मग चोख तरी तोचि भांडारी कीजे ।तैसा किरीटी तूं आतां माझें ।निजधाम कीं॥५२॥*
    एखादे वेळी येणार्‍या माणसावर प्रथम घरातील सर्व सोपवून पाहावे व त्याची सचोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे. त्याप्रमाणे, अर्जुना! माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला.
*🌷ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें ।गिरी देखोनि सुभरें ।मेघु जैसा ॥ ५३ ॥*
    अर्जुनाला अत्यंत एकाग्रतेने ऐकताना पाहून, सर्व देवांचे देव भगवान श्रीकृष्ण, वर सांगितल्याप्रमाणे अत्यंत आदराने बोलले आणि ज्याप्रमाणे पर्वताला पाहून पाण्याने भरलेले मेघ पर्वतावर वळून येतात,
*🍀तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो ।सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥ ५४ ॥*
   त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा भगवान श्रीकृष्ण म्हणतात “महाबाहो अर्जुना! सांगितलेला भावार्थच पुढे पुनः सांगणार आहे. ऐक.
*🌷पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे ।यालागीं नुबगिजे ।वाहो करितां ॥ ५५ ॥*
कारण दरवर्षी शेत पेरावे व जसजशी पिकांची वाढ होत असलेली पाहावी, तसतशी त्या शेताची मशागत करण्याचा त्रास मानू नये.
*🍀पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता ।म्हणौनि सोनें पंडुसुता ।शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥*
वारंवार पुटे दिली असता सोन्याचा कस वाढतो, म्हणून वारंवार सोने शोधावेसेच वाटते.
*🌷तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा ।आम्ही आपुलियाचि स्वार्था ।बोलों पुढती ॥ ५७ ॥*
त्याचप्रमाणे अर्जुना! तुला वारंवार सांगण्यात तुझ्यावर उपकार करतो असे नसून, मी आपल्या स्वार्थाकरिता पुनः बोलत आहे.
*🍀जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? ।परि ते सुखाचे सोहळे भोगणें ।माउलिये दिठी ॥५८॥*
    ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद, तो बालक काय जाणत असतो? पण ते सुखाचे सोहळे, आईच आपल्या दृष्टीने भोगत असते.
*🌷तैसें तुझें हित आघवें। जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे ।ऐसें आहे ॥५९॥*
    त्याप्रमाणे अर्जुना! आमचे निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसे जसे तुला आत्मसुख प्राप्त होईल, तसे तसे आमचेही सुख दुप्पट वाढत जाते.
🍀 *आतां अर्जुना असो हे विकडी ।मज उघड तुझी आवडी ।म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥ ६० ॥*
   आता अर्जुना ! हे अलंकारिक भाषण असो. मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असताना तृप्तीचा अवसर लाभत नाही.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🌹  *ओवी  ६१ पासून उद्या*
🍀  *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!