IHRA News

IHRA Live News

 महिलांनी निर्भिडपणे विविध क्षेत्रात कार्य करावेः तेजस्विनी भिलारे

पाचगणी प्रतिनिधी: तस्लिम मुजावर
आजच्या काळात महिलांनी निर्भिडपणा,जिद्द,चिकाटी अंगी बाळगून विविध क्षेत्रात कार्य करावे.महिलांनी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आदी स्वरूपाचे कार्य करताना सामाजिक संकेताचे पालन करीत पुढचे यशस्वी पाऊल टाकणे गरजेचे आहे.असे मत हिल रेंज स्कूलच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी व्यक्त केले.

      पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये राष्टीृय सेवा योजना व महिला सक्षमीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी उपकार्यकारी अभियंता दीपाली बर्गे,मा.नगरसेविका सुमनताई गोळे,तेजस्विनी भिलारे  ,नितीन भिलारे,प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर, प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,डाॅ.तुकाराम राबाडे,महिला सक्षमीकरण समिती प्रमुख डाॅ.सुनिता गित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात मिळविलेले यश व घेतलेली गरूडभरारी उल्लेखणीय आहे.समाजात महिलांना सामाजिक,भावनिक आदी दृष्टीने समजावून घेणे महत्वाचे आहे.महाविद्यालयात मुलींना सक्षम करण्यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहे.
     उपकार्यकारी अभियंता दीपाली बर्गे म्हणाल्या,महिलांनी मिळालेल्या करिअरला संधी मानून त्यात यश संपादन करावे.महिला शिकल्या तरच समाजात परिवर्तन घडेल.
    यावेळी हिल रेंज स्कूलच्या सेक्रेटरी तेजस्विनी भिलारे, उपअभियंता दीपाली बर्गे,मा.नगरसेविका सुमनताई गोळे,तेजस्विनी भिलारे,जितीन भिलारे,पोलीस अधिकारी श्री  कांबळे ,प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अमृता कुलकर्णी व प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.सुनिता गित्ते यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!