दिवसा घरफोडी करणारे चोरटे २४ तासात पोलीसांच्या ताब्यात
प्रतिनिधी/ दिपाली चौहान (जिल्हा वर्धा)
वर्धा जिल्ह्यात सद्यस्थितीत चोरीचा प्रकार खूप वाढीवर आहे .तसेच दिवसा घरफोडी करणारे चोरटे २४ तासात पोलीसांच्या ताब्यात आहे,घटना अशी झाली की, फिर्यादी नामे संदीप मदन उगेमुगे वय ४८ वर्ष, रा.गणेश नगर बोरगाव यांनी दि. २०/०१/२०२२ रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्याचे आई वडिल राहत असलेले घरी चितोडा येथे ते गेले व गावात मयत झाल्याने घराला कुलुप लावुन अत्यविधी करिता गेले असता व घरी परत आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला व घरातुन दोन अनोळखी ईसम त्यांच्या डोळ्यासमोरून जोऱ्याची धाव घेत पळुन गेले त्यानी घरात पाहणी केली असता घरातील नगदी ३००० रु व दोन सँमसंग कंपनीचे मोबाईल कि. २००० असा एकुन ५०००/- रु चा माल चोरी गेल्याचे तक्रार वरुन सदरचा गुन्हा नोद करुन तपासात घेतला
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळाले ल्या माहिती प्रमाने आरोपी नामे रामा देवराव देउळकर वय २६ वर्ष २) रामचंद्र मारोती दांडेकर वय ३२ वर्ष, दोन्ही रा गिट्टी खदान बोरगाव मेघे यास अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरलेले दोन सँमसंगचे मोबाईल कि. २००० रु चे व नगदी रक्कम जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय ईगळे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल चे निलेश कात्तोज्वार यांनी केली.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ