वर्धा१८:- प्रतिनिधी /दिपाली चौहान
पोस्टे सिंधी(रेल्वे )
आरोपी:- भारत लक्ष्मण पुसनाके वय ५५ वर्ष रा :- कांडळी ता. समुद्रपूर जि वर्धा
अटक ता :- १८/११ २१
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस दला समक्ष तपासात आज दुर्दैवी घटनेचा पत्ता लागला
०२/११/२१ रोजी मयत नामें मंदा भारत पुसनाके वय ४५वर्ष हिचा कुजलेलेल्या अवस्थेत मृतदेह तिच्या राहते घरी कांडळी येथे मिळून आला व त्या वरून पोस्टे सिंधी( रेल्वे) येथे मर्ग क्र १९/२०२१ कलम १७४ जा. फौ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला होता.
सदर मर्ग घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली असता सदर मृतदेहची पाहणी केली असता घातपाताचा संशय बळावल्याने पो.नि श्री संजय गायकवाड साहेब यांनी मार्गदर्शन करून सदर मर्गाचा सखोल व समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्याने व सदर गुन्ह्यात कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने घटनेची सखोल तपास करून सलग पंधरा दिवस पाठपुरवठा स.पो.नि महेंद्र इंगळे व पो.उपनि.सौरभ घरडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पथकांन सह करण्यात आला असता मुखबीरच्या गोपनीय माहिती च्या आधारे अशी माहिती मिळाली कि दि. ३०/१०/२१ रोजी मयत मंदा व तिचा पती भारत यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झाले होते व तिचा पती हा घटने पासूनच गावात दिसला नाही वरून संशय अजुन बळावल्याने त्याचा पाठपुरवठा करीत माहितीच्या आधारे वायफळ बेडा, पालोती, केळझर येथे शोध घेत असता मुखबीर मार्फत विश्वासनीय माहिती मिळाली कि भारत पुसनाके हा हरदोली ता.आर्वी शेत शिवार येथे असल्याची माहिती मिळाली वरून पथकान सह सदर शेत शिवरात जाऊन शीताफीने आरोपीस ताब्यात घेऊन त्यास कोशल्यपूर्ण सखोल विचारपूस केली असता सदर आरोपी याचे दि ३०/१०/२१ रोजी त्याचे पत्नी सोबत भांडण झाल्याने व पैश्यान वरून नेहमी होणाऱ्या वादला कंटाळून तिचा जागीच गळा दाबून खुन केल्याची कबुली दिली.
वरून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोस्टे सिंधी( रेल्वे) यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर साहेब, मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत साळुंके साहेब, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनात स. पो. नि महेंद्र इंगळे, पो. उपनिरीक्षक सौरभ घरडे पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, यशवंत गोल्हार, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे, अभिजित वाघमारे, राकेश अष्टनकर व अनुप कावळे सायबर पथक यांनी केली
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ