IHRA News

IHRA Live News

संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *अध्याय ४था*
🌿 *ज्ञानकर्मसंन्यासयोग*
🚩 *ओवी ७१ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🔔 *काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धि यजन्त हि देवताः|क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा|४-१२|*
अर्थ 👉 _कर्माच्या सिद्धीची कर्मफलाची इच्छा करणारे लोक या लोकी देवतांची उपासना करतात. कारण मनुष्यलोकी कर्मापासून होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते._
(मनुष्याचा देवाबद्दलचा अविवेक)
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 *मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥७१॥*
     मग मनात *नाना हेतू* धारण करून, अनेक देव मानून त्यांची अनुरूप उपचारांनी उपासना करतात.
🌷 *तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त ।परी ते कर्मफळ निश्चित। वोळख तूं॥७२॥*
     या उपासनेत ज्यांचे जे इच्छित असेल, ते त्यांना तसेच प्राप्त होते. परंतु ते सर्व त्यांच्या उपासनेचेच फळ आहे, असे निश्चितपणे समज.
🌷 *वाचूंनि देतें घेतें आणिक। निभ्रांत नाही सम्यक। एथ कर्मचि फळसूचक।मनुष्यलोकीं ॥७३॥*
    खरोखर पहाता देणारा आणि  घेणारा कर्माशिवाय निःसंशय दुसरा कोणी नसून ह्या मनुष्य लोकी कर्मापासूनच फलप्राप्ती होते.
🌷 *जैसें क्षेत्रीं जें पेरिजे।तेंवांचूनि आन न निपजे। कां पाहिजे तेंचि देखिजे।दर्पणाधारें॥७४॥*
    जसे जमिनीत जे धान्य पेरावे तेच उत्पन्न होते, किंवा आरशात जे पहावे तेच दृष्टीस पडते.
🌷 *ना तरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी ।निमित्तयोगें ॥७५॥*
    किंवा अर्जुना। डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच शब्द प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो.
🌷 *तैसा समस्तां यां भजनां। मी साक्षिभूतु पैं अर्जुना। एथ प्रतिफळे भावना। आपुलाली ॥७६॥*
     त्याचप्रमाणे अर्जुना! या सर्व  उपासनांचा मीच साक्षीभूत आहे, या उपासनेत ज्यांची त्याची भावना फलद्रूप होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔔 *चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः|तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्|४-१३|*
अर्थ👉  _गुण आणि कर्म यांचे विभाग करून चार वर्णाचे लोक मी निर्माण केले. या कर्माचा जरी मी कर्ता आहे तरी परमार्थत: मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण._
गुण-कर्म-विभागणी
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 *आतां याचिपरी जाण। चार्‍ही आहेती हे वर्ण। सृजिले म्यां गुण। कर्मागे ॥७७॥*
    आता ह्याचप्रमाणे हे जे चार वर्ण आहेत, तेही गुण व कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आहेत.
🌷 *जे प्रकृतीचेनि आधारें। गुणाचेनि व्यभिचारें।कर्में तदनुसारें। विवंचिली॥७८*
    आणि त्या चारही वर्णाच्या कर्माची, आपापल्या प्रकृतीधर्माने आणि गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे.
🌷 *एथ एकचि हे धनुष्यपाणी| परीं जाहले गा चहूं वर्णीं।ऐसी गुणकर्मीं कडसणी।केली सहजें॥७९॥*
    अर्जुना, हे सर्व लोक एकच असून चतुर्वर्णात्मक झाले, गुण व कर्म  यांच्या  योगाने त्यांच्या चार वर्णाची व्यवस्था सहज झाली
🌷 *म्हणोनि आईकें पार्था। हे वर्णभेदसंस्था।मी कर्ता नव्हे सर्वथा। याचिलागीं॥८०॥*
   गुणकर्मानुरूपच वर्णभेदाची व्यवस्था झाली आहे, म्हणून पार्था, या वर्णभेदाच्या स्थापनेचा मी मुळीच कर्ता नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔔 *न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा|इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते |४-१४|*
अर्थ👉  _कर्मे मला बंधन करत नाहीत. कर्मफलाविषयी मला इच्छा नाही. मला अशा प्रकारे म्हणजे मी आत्मरूप आहे असा जो जाणतो तो कर्मापासून बंध पावत नाही._
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 *हें मजचिस्तव जाहलें।परी म्यां नाहीं केलें।ऐसे जेणे जाणितलें।तो सुटला गा ॥८१॥*
    हा वर्णभेद जरी माझ्या पासून झाला आहे, तरी तो मी केला नाही, असे जो ओळखतो तोच कर्मातीत झाला.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🔔 *ओवी८२ पासून  उद्या*
🔔 *¦¦जयजय रामकृष्ण हरि¦¦*

0Shares
error: Content is protected !!