IHRA News

IHRA Live News

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.

0Shares
error: Content is protected !!