IHRA News

IHRA Live News

सर्वसामान्यांचा ताण वाढला,गाॅस अाणि पेटो्ल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले. कदिर मणेर. प्रतिनिधी,सातारा जिल्हा दि.९ अाक्टों, महागाईमुळे सर्वसामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावले आहेत. एनपीजी आणि पीएनजीच्या दरात काही दिवसांपूर्वीच वाढ झाली होती. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली होती त्यात आता स्वयंपाकाच्या गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत.स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

सबसिडी आणि विनासबसिडी स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रूपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत २४ ते ३० पैशांची तर डिझेलच्या किंमतीत ३२ ते ३६ पैशांची वाढ झाली आहे. देशातील इंधनदरांनी आत्तापर्यंतचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.

‘अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का? सर्वसामान्य लोकांसाठी जीवनावश्‍यक गरज असलेला स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वारंवार वाढ झाल्याने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षभरात स्वयंपाक गॅसमध्ये 8 वेळा वाढ झाली.या वर्षअखेरीपर्यंत तो हजार रुपयांवर जाऊ शकतो. काही गृहीनी म्हणतात अाता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली.युपीए काळात पेटो्ल,डिझेलमध्ये एक रुपयाची वाढ झाली तरी तांडव करणारे भाजप अाता मुग गिळून गप्प का ? अच्छेदिन,खुप झाली महागाईची मार,कोठे नेहून ठेवला अाहे महाराष्ट्,देश असे जाब विचारणारे अात्ताचे सत्ताधारी पहील्या सरकार पेक्षा १० पटीने या सरकारने महागाई वाढवली अाहे.जनते मध्ये याचा रोष चांगलाच वाढलेला दिसत असून यातूनच असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय.

0Shares
error: Content is protected !!