IHRA News

IHRA Live News

*जिनिंग फॅक्टरीतील कापसाच्या गठानी चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक आरोपीकडून ५,९६,२५०/- रु चा मुद्देमाल जप्त*

वर्धा 9 :- प्रतिनिधी /दिपाली चौहान

सदर सूत्रांच्या माहीतीच्या आधारावर फिर्यादी नामे श्री चंदनसिंग देवसिंग झाला,
, रा. बोरगाव मेघे यांनी दिनांक ०६-१०-२०२१ रोजी तक्रार दिली की, वायगाव निपाणी येथील जिनिंग फॅक्टरीतील कापसाच्या कंपनी टीनाच्या शेडमध्ये ठेऊन असलेले १२ गठानी मागील २ ते ३ महिन्यामध्ये कोणीतरी अनोळखी इसमाने जु.की. २,९७,०००/- रु. चा माल चोरून नेला अश्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावंगी मेघे येथे
गुन्हा नोद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांना तपासादरम्यान आरोपी 1) साहिल निलेश अलोने, वय १९ वर्ष, रा. गौरक्षण, वर्धा, 2) हितेश प्रशांत अलोने, वय १९ वर्षे, रा. गोरक्षण, वर्धा, 3) अजय नरेंद्र कान्हेरे, वय २० वर्ष, रा. सेवाग्राम, 4) वैभव उर्फ बंटी निळकंठराव दुबे, वय २२ वर्षे, रा. गिट्टीफैल, 5) नसीब खा शेर खा पठाण, वय 38 वर्षे, रा. आर्वी नाका, वर्धा, यांना विचारपूस केली असता आरोपितांनी गुन्ह्यातील माल चोरून नेल्याबाबत कबुली दिल्याने त्यांचे जवळून १) एक पल्सर वाहन क्र MH 49KG2302, २) ड्रीम युगा मो सा क्र MH32AB 9557, ३) सुझुकी मोपेड क्र MH32AN3218, ४) बजाज कंपनीचा आटो रिक्षा क्र MH32AK 0596, ५) कापसाच्या रुईच्या गाठणी ११ नग व एक खुली रुईची गठाणं कि. २,७६,२५०/- असा जुमला किमंत ५,९६,२५०/- रु. जप्त करून गुन्हा उघडकीस आणला व आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन सावंगी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. गोपाल ढोले, सौरभ घरडे, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, निरंजन वरभे, गजानन लामसे, नरेंद्र डहाके, हमीद शेख, यशवंत गोल्हर, रणजीत काकडे, प्रमोद पिसे, अवि बनसोड, नितेश मेश्राम, नितीन इटकरे, अभिजित वाघमारे, पवन पन्नासे, रामकृष्ण इप्पर, नवनाथ मुंडे, राजेंद्र जयसिंगपुरे व दिनेश बोधकर यांनी केले आहे.

0Shares
error: Content is protected !!