वर्धा१९:-प्रतिनिधी /दिपाली चौहान १९, फेब्रुवारी, २०२३
केवळ महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते ,अनेक विद्वान, तत्त्वज्ञ ,इतिहासकार, छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात ,19 फेब्रुवारी रोजी विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, गेली दोन वर्ष कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे जयंती धूमधडाका मधे साजरी झाली नाही ,परंतु यंदा ओंजळ बहुद्देशीय संस्था मध्ये जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
ओंजळ बहुद्देशीय संस्था मधले चिमुकले कोणताही सण ,समारंभ मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात, म्हणून आज शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अंगणात दिवे लावून रांगोळी काढून महाराजांच्या प्रतिमेचे व मूर्ती चे पूजन केले,
संस्थेचे सदस्य आदित्य युवनाते यांनी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा फळ्यावर रेखाटली, लहान चिमुकल्यांनी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांवर गीत सादर केले.तपस्या पाटणकर या विद्यार्थिनीने सुंदर अस महाराजांच्या जीवनावर भाषण दिले.
शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिज्ञा म्हणून महाराजांना मानवंदना दिली.
यावेळी सूत्रसंचालन करताना संस्थेचे अध्यक्षl कु.प्राजक्ता मुते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजून सांगितला व त्यातून आपण काही बोध घेतला पाहिजे असे सुद्धा त्यांनी संबोधले.
यावेळी संस्थेचचे सदस्य अभिजीत निनावे ,सारंग भुयार व सदस्य सौरभ श्रीवास्तव यांनी छत्रपतींच्या अंगी असणाऱ्या गुणांपैकी एखादा गुण जरी आपण स्वतः उतरण्याचा प्रयत्न केला तर ती खरी शिवजयंतीची फलश्रुती ठरेल असे मत मांडले.
यावेळी संस्थेचे सदस्य ,वैष्णवी मोटघरे, श्रद्धा लुंगे येरावार , रेणू मस्कर ,माजी विद्यार्थी , उदय पेंदाम, सौरभ वाघमारे, हर्षल परतेकी शबा शेख ,इत्यादी सदस्य गण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ