वर्धा:_ स्थानिक बोरगाव (मेघे) येथील गोल्डन किड्स कॉन्व्हेंट अँड स्कूलमध्ये Renaissance एक नया सवेरा 2024 सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच ग्रामपंचायत संतोष सेलुकर यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष डॉ. सुभाष खंडारे यांच्या अध्यक्ष करण्यात आले .यावेळी शाळेच्या सचिव प्रा. डॉक्टर सुहास खंडारे व शाळेचे मुख्याध्यापक सचिन झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत मधुर गीताने करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली ,त्यानंतर नर्सरी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, हॉरर शो, देशभक्तीपर नृत्य, राजस्थानी, नृत्य, प्रेम डान्स गोंडी नृत्य तांडव नृत्य रेन डान्स ,चंद्रयान मोहीम कोळी नृत्य ,या प्रकारच्या कलाविष्कार सादर केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फरझाना पठाण व मयुरी रायमल यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी ते करता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक वृद यांनी परिश्रम घेतले.
गोल्डन किड्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ