प्रतिनिधी:गडचिरोली
दिनांक २७/१२/२०२२ रोजी जिल्हा पुरवठा विभाग तसेच तालुका पुरवठा विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सादीक झवेरी माजी अध्यक्ष जिल्हा ग्राहक निवारण मंच ,सौ.रोझा बारसागडे सदस्य जिल्हा तक्रार निवारण मंच , श्री वीरेंद्र जाधव उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार धानोरा, श्री महेंद्र गणवीर तहसीलदार गडचिरोली,श्री गजानन कोकोडे जिल्हा खरेदी अधिकारी, श्री रुपचंद फुलझेले सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग जिल्हा गडचिरोली ,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे अशासकीय सदस्य श्री चंद्रशेखर भडांगे ,श्री प्रवीण घाटे,श्री अरुण पा.मुन्घाटे, श्री संजय मेश्राम, सौ.रजणी गेडाम, व अँड आरजु,उपस्थित होते ,
ग्राहक हक्क व ग्राहकांचे कर्तव्य याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले – कोरोना काळात अन्न धान्य विक्रेते यांनी बिकट परिस्थितीत कसे काम केले तसेच दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती असताना सुद्धा प्रत्येक लाभाऱ्यापर्यंत अन्न धान्य पुरवठा करून कर्तव्य बजावणाऱ्या अन्न धान्य विक्रेते यांचा सत्कार करण्यात आला .तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तने निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आले होते विजेत्या उमेदवारांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव पुरस्कार देण्यात आले .
कार्यक्रमचे सूत्र संचालन श्री जगदीश बार्देवार निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार पुरवठा ,श्री पतंगे ,श्रीमती आंबेकर पुरवठा निरीक्षक गडचिरोली व जिल्हा पुरवठा तथा तालुका पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते .
There is no album selected or the gallery was deleted.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ