IHRA News

IHRA Live News

जावळी तालुक्यात पावसाची संततधार कायम !

जावळी प्रतिनिधी/कदिर मणेर

मागील दोन दिवसांपासून जावळी तालुक्यामध्ये कुडाळ,सायगाव,करहर,मेढा येथे पावसाची संततधार कायम आहे रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून पावसाच्या हलक्या तसेच मध्यम सरी कोसळत होत्या.

सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.त्यानंतर सकाळी सात वाजता आणि त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास पावसाच्या पुन्हा एकदा हलक्या सरी कोसळल्या तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जवळपास अर्धा तास पावसाने जोरदार बॅटिंग केली.

अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. तालुक्यातील ग्रामीण भागातही मागील दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे.सद्यस्थितीत भुईमुग तसेच ऊस या पिकांना पावसाची गरज होती.त्याचबरोबर भात पिकालाही या पावसाचा मोठा फायदा झाला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात शेतातील अंतर्गत कामे विशेषत: भांगलण ठप्प झाली आहे.पावसामुळे भागातील नदी,नाले तुडूंब भरुन वाहत आहेत.

0Shares
error: Content is protected !!