औंजळ बहुउद्देशीय संस्थेत आगळ्यावेगळ्या पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना
प्रतिनिधी / दिपाली चौहान
वर्धा 12:- आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजडेल सोनेरी पहाट !!बाप्पा तुझ्या आगमनाची!!”
सर्वांचा लाडका गणाधीश म्हणजेच गणपती…..! गणपतीच्या आगमनाची सर्व भक्तांनाच ओढ असते. कारण सर्व कामाची सुरुवात
गणपतीच्या पुजनानेचं होते.
तीचं ओढ दरवर्षीप्रमाणे आमच्या औंजळ बहुउद्देशीय संस्थेला पण असते. त्या उत्साहाने आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी व सदस्य बाप्पाच्या आगमनाकरिता विविध रंगीबेरंगी पर्यावरणपूरक सजावट करण्यासाठी खूप आतुर असतात. तुम्हा सर्वांना माहितीचं आहे की, औंजळ बहुउद्देशीय संथा ही सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत तर आहेचं परंतु , दरवर्षी ओंजळ बहुउद्देशीय संस्था ही गणपतीची स्थापना सामाजिक उपक्रमाद्वारे देण्याचा प्रयत्न करत असतात
कारण औंजळ बहुउद्देशीय संस्थेला ८ वर्षापासून गणपती स्थापनेची परंपरा आहे. विशेष म्हणजे आम्ही दरवर्षी गारीच्या मूर्तीची स्थापना करतो आणि त्याच मूर्तीची वर्षभर दररोज नित्यनेमाने पुजा करतो.
संस्थेतील सदस्य आपल्या कलागुणांच्या आधारावर सजावट करतात, वेगवेगळ्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो.
त्याचप्रमाणे, या वर्षी आम्ही आगळ्यावेगळ्या पर्यावरणपूरक थीममध्ये सजावट केलेली आहे.
ज्यामध्ये, शहरीकरण व ग्रामीण
वस्तीतील जनजीवनावर आधारित थीम तयार केलेली आहे.
जसे की, ग्रामीण व शहर येथील सत्य परिस्थिति चित्रित करण्यात आली आहे.
म्हणजेच, ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा सारखाच होतो. परंतु, त्याचा वापर हा वेगवेगळा होतो.
ग्रामीण भागात नदीचे पाणी उपलब्ध असल्याने सर्व गावं हिरवकंच असतं, शेतं हिरवेगार असतात, प्रदूषण नियंत्रण असते, कौलारू घरे असतात,सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने जनजीवन जगत असतात.
याउलट, शहरी भागात शहरीकरण असल्याने उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असतात. उद्योगाचे सांडपाणी नदीत मिसळून पाणी दूषित होतात, त्यामुळे झाडांची वाढ होत नाही, मोठमोठ्या इमारती बघायला मिळतात, प्रदूषण जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते.
ती परिस्थिती भविष्यात आपल्या पुढील पिढीला उद्भवायला नको, यासाठी आम्ही पर्यावरणपूरक थीम तयार करुन वर्तमानकाळातील पिढीला जागरूक करण्यासाठी हा संदेश देतो आहे. की, पाण्याचा योग्य प्रकारे वापर करा. योग्य प्रकारे वापर केल्यास पुढील पिढीला प्रदूषणासारख्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही, याची जाणीव होते.
त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी अशीच पर्यावरणपूरक गणपती मुर्तीची स्थापना केल्यास नदीचे पाणी दूषित होणार नाही, पिण्यास शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल व शहरीकरण सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, हे यावरुन सिद्ध होते.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ