IHRA News

IHRA Live News

औंजळ बहुउद्देशीय संस्थेद्वारे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

वर्धा :- प्रतिनिधी / दिपाली चौहान

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने औंजळ बहुउद्देशीय संस्था वर्धा यांच्या पुढाकाराने आज जागतिक आदिवासी दिवस व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमास मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. ज्योतीताई लुंगे, जेष्ठ समाजसेविका तसेच मा. ललिताताई कुबडे, समाजसेविका वर्धा, मा. मोहित उमाटे, युवा समाजसेवक, मा. प्रविन सराटे, युवा समाजसेवक तथा नागठाणा अकॅडमी वर्धा, मा.निखिल कुंबरे, युवा सामाजिक कार्यकर्ता व सौरभ देशमुख, समाजसेवक भाजपा युवा मोर्चा वर्धा, चेतन गुजर, युवा समाजसेवक व सीमा दुबे, पोलीस अंमलदार, वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय औंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ता मुते यांनी केले. व सर्व मान्यवर करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ घेण्यात आला. व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि विशेष म्हणजे संस्थेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी लोककलेवर नृत्य सादर केले. त्यानंतर औंजळ बहुउद्देशीय संस्थेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व त्यासोबतच आदिवासी भाषेवरील पुस्तक भेट देण्यात आले. तसेच संस्थेतील सर्व सदस्यांना सुद्धा आदिवासी पुस्तक भेट स्वरुपात दिले.
त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना निखिल कुंबरे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या.आणि प्रियंका पावडे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्याप्रमाणे, मंचावरील मान्यवरांनी संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले व भावी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

आणि कार्यक्रमाचा शेवट “जय सेवा, जय सेवा” , “भारत माता की जय” या जयघोषात झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. श्रद्धाताई लुंगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता औंजळ बहुउद्देशीय संस्थेतील मनोज उईके, प्राजक्ता मुते, श्रद्धाताई लुंगे, रेणुका मस्कर, रक्षा अवजेकर, अर्शिया बेग, दीप्ती चव्हाण,श्रद्धा सौयाम तसेच सौरभ श्रीवास्तव, अभिजीत निनावे, अक्षय आगे, सारंग नेवरे, यश पाटणकर, हर्षल परतेकी, उदय पेंदाम, आलोक भरोटे, आदित्य ईवनाते,यश खापरकर,स्नेहल पवार व इतर सर्व सदस्य आणि पालकवृंद यांचे मोलाचे योगदान लाभले.

0Shares
error: Content is protected !!