IHRA News

IHRA Live News

CAIT वर्धा महिला विंग व औंजळ बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित हर घर तिरंगा अभियान संपन्न

वर्धा7 :-प्रतिनिधी /दिपाली चौहान

आपल्या भारताचा तिरंगा प्रत्येक घराघरात पोहोचावा व तिरंग्याचा आदर करण्याची सर्व भारतीयांना जाणीव व्हावी या उद्देशाने आज वर्धा शहरात CAIT वर्धा महिला विंग व औंजळ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियान आयोजित करण्यात आले होते.
या मध्ये मातृशक्ती दुर्गा वाहिनी , गुरुकुल कोचिंग क्लासेस कोचिंग यादी सेवाभावी संस्थांनी सहभाग दर्शविला,अभियानामध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच, कॅट लेडीज विंग चया पदाधिकारी शिखा शर्मा नेतृत्वामध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. औंजळ बहुउद्देशीय संस्था वर्धा चे पदाधिकारी यांचा समावेश होता. “भारत माता की जय” “वंदे मातरम” या जयघोषात शहरातील नागरिकांना तिरंगा प्रदान करुन आपल्या घरी तिरंगा लावण्यास आवाहन केले. या मोहिमेत शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध व्यक्तिंच्या भाषणातून नागरिकांना तिरंगा अभियानाची जनजागृती केली. व देशभक्तीपर जयघोषात या मोहिमेची सांगता झाली. ही मोहिम यशस्वीतेकरिता CAIT वर्धा च्या समन्वयिका शिखा शर्मा, अश्विनी जलताडे, अनुराधा महाकाळकर, पल्लवी राऊत, इ.महिला पदाधिकारी तसेच औंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ता मुते, अर्शिया बेग दीप्ती चव्हाण, रक्षा अवजेकर व अभिजीत निनावे, सारंग नेवरे, आणि संस्थेचे विद्यार्थीगण व इतर सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले.

0Shares
error: Content is protected !!