IHRA News

IHRA Live News

राष्ठ्वादीशी प्रामाणिक असणार्यांचा विचार केला जाईल आ.‌शशिकांत शिंदे.

कदिर मणेर/जावऴी प्रतिनिधी
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाण्याची शक्यता असून या करिता जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ठ्वादीचे विधानपरिषद आ.शशिकांत शिंदे यांनी दिली.येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीविषयी मत व्यक्त करताना आ.शशिकांत शिंदे बोलत होते.जावऴी तालुक्यात गेली पाच वर्षे शरीराने आपल्या पक्षात राहून कार्याने मात्र इतर पक्षांशी जवळीक साधणार्‍या नेते व कार्यकर्त्यांच्या या प्रवृत्तीने जनतेलाही विचार करण्यास भाग पाडले.त्यांच्या अशा या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मलिन झाली,असे आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्षाला एक वेगळी ओळख असून काहीजण पक्षात राहून दुसर्‍याच्या वळचणीला आपली निष्ठा बांधत आहेत,अशा नेत्यांचा आणि कार्यकर्यांचा आता विचार करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जो राष्ट्रवादीशी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहील त्यांचाच विचार केला जाईल,असा इशाराही आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला.काही राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडत स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची गर्जना केली आहे. याबाबत पक्षाच्या जिल्ह्यातील आणि वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेवून याबाबत निर्णय घेतला जाईल,असेही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

0Shares
error: Content is protected !!