IHRA News

IHRA Live News

ज्ञानेश्वरी यशोगाथा

🍀 *ठाणे, श्री सचिन शिंदे*
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍀 *विभूती योग*
🌸 *अध्याय दहावा*
🍀 *ओवी २११ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌼एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें ॥२११॥*
    एरवी मी कसा व केवढा आहे, हे मलाच स्पष्ट कळत नाही, म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिध्द आहेत त्या सांगतो, ऐक.
*🌾जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणितलिया होती किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय॥२१२॥*
    ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्षच हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असता, संपूर्ण विभूती जाणल्या जातील.
*🌼कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥२१३॥*
  किंवा बगीचा हातात आला असता, त्यातील फुले, फळेही अनायासे हातात येतात, याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागेल.
*🌾एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें ॥२१४॥*
    वस्तुतः धनुर्धरा! माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशही माझ्या ठिकाणीच असते.
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌻अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥२०॥*
अर्थ 👉  _हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंत:करणामधे असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदि, मध्य व अंतही आहे_
(विभूती कथन)
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌼आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैका । भूतमात्राचां ठायीं ॥२१५॥*
     काळे कुरळे केस मस्तकावर धारण करणार्‍या, धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना! ऐक, मी प्रत्येक भूताचे ठिकाणी आत्मरूपाने आहे.
*🌾आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥२१६॥*
     या भूतांच्या आत अंतःकरणात – मीच असून, बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आदी, अंती व मध्येही मीच आहे.
*🌼जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥२१७॥*
     ज्याप्रमाणे मेघाला खाली-वर, आत -बाहेर एक आकाशच असते. आकाशातच मेघ उत्पन्न होतात व आकाशातच राहतात.
*🌾पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेवीं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥२१८॥*
     शेवटी जेव्हा ते नाहीसे होतात, तेव्हा आकाशरूपच होऊन जातात, त्याप्रमाणे सर्व भूतांचे उत्पत्ती, स्थिती, लय मीच आहे.
*🌼ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥२१९॥*
  असे माझे नानाविध व व्यापक होणे हे माझ्या विभूती योगामुळे होत असते असे समज. तर आता आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियांच्या द्वारा ऐक- म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक.
*🌾याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रति । सांगेन म्हणितलें तुज प्रीती । त्या प्रधाना आइकें ॥२२०॥*
   मी सर्वत्र  व्यापून असल्यामूळे, विभूती सांगणे खरोखर संपले; पण अर्जुना! तुला विभूती सांगतो असे म्हटले, म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूती ऐक.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🌾  *ओवी  २२१ पासून उद्या*
🌾 *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!