IHRA News

IHRA Live News

पाचगणी मुख्याधिकारी यांनी नागरिकाच्या गरजा समजून कामे करावी.

पाचगणीप्रतिनिधी/नौशाद सय्यद. पाचगणी (महाबळेश्वर):पाचगणी नगर परिषद मुख्य अधिकारी साहेबांनी पाचगणी मधील नागरिकांची गरज असणारी विकास कामे करावी, पांचगणी गिरिस्थान नगर परिषदच्या मुख्य अधिकारी साहेबांनी जेव्हा माजी नगराध्यक्ष व नगर सेवक यांचा कालावधी संपला त्यानंतर विकासाच्या कामाचा सपाटा लावलेले आहे परंतु पांचगणी मधील नागरिकांची गरज समजून विकासाची कामे करावी अशी चर्चा पाचगणीमध्ये राहणारे नागरिक करत अाहेत.जे काम मुख्य अधिकारी साहेबांनी केलेला आहे त्या कामावर पांचगणी चे नागरिक खुश नाहीत जसेे टेबल लेंद वरील ट्रॅक टेबल लेंद वरून येणारे गटार आणि नाले हे देखील निकृष्ट दर्ज्याचे आहेत.मटण मार्केट मधे बसवलेले मशीन लाखो रुपयांची ते बंद पडलेले आहेत. पांचगणी मुख्य शहरा मधे बिलिमोरिया रोड,सिकंदर रोड,अर्थ रोड,अर्क रोड,नाले वा गटारे अनेक वर्षांपासून तुंबलेलीे आणि बंद आहेत,तसेच मलबार बेकरी जवळील घाटजाई फ्लॉवर मिल अाठा चक्की पाच ते सहा वर्षे झालं त्या मधील माथी कडलेली नाही टेबल लॅद वरून जोराने येणारे पाणी तिथे राहणाऱ्या लोकांच्या घरात जात आहे.अनेक वेळा अर्ज देऊन ही देखील पांचगणी मुख्याधिकारी या समस्यावर लक्ष देत नाही.त्यामुळे पाचगणीतील नागरिकांमधून अावाज निघतो आहे की पाचगणीच्या लोकांची गरजे समजून विकासाचे कामे करावी.

0Shares
error: Content is protected !!