IHRA News

IHRA Live News

शहिद जवान प्रथमेश पवार यांना अखेरचा निरोप;हजारो नागरिकांचा जनसागर लोटला !

कदिरमणेर/सातारा प्रतिनिधी कुडाळ(सातारा)जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार वय (२२) यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण अाले अाहे.प्रथमेश हे तीन महिन्यापुर्वीच जम्मू येथील पोस्टिंगवर सैन्यदलात कार्यरत झाले होते.अवघ्या तीनमहिन्यापुर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले.त्यामुळे गावासह संपुर्ण जावळी तालुक्यामध्ये शोककळा पसरली अाहे.त्यांच्या पश्चात अाई वडिल,एक भाऊ असा परिवार अाहे. जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने पुणे येथे पहाटेच्या सुमारास अाले.त्यानंतर पुणे येथील १०१ युनिटच्या वतीने मानवंदना देण्यात अाली.यानंतर पुणे येथील त्यांच्या युनिट सहकार्यांसोबत पाचवड-कुडाळ मार्गे जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव अाल्यानंतर पाचवड,सरताळे,कुडाळ या गावांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी शहिद जवान प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली वाहन्यासाठी दुतर्फा उभी होती,फुले टाकत होती.वंदे मातरम,अमर रहे च्या घोषणा देत होती.या सर्व गावांतील हजारो नागरिकांनी,अश्रू नयणाने अखेरचा निरोप दिला. (डेरेवाडी येथे अखेरची मानवंदना व अंत्यविधी- जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव त्यांच्या बामणोली तर्फ कुडाळ या गावामध्ये अाणण्यात अाले तेथुन डेरेवाडी येथील दत्त मंदिराच्या लगत असणार्या जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी असणार्या प्रांगणात शहिद जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात अाले होते.त्या ठिकाणीच अखेरची मानवंदना देऊन अंतिम संस्कार करण्यात अाले.) ( ग्रामस्थांकडून रात्रभर तयारी-अापल्या गावचा सुपुत्र देशासाठी शहिद झाल्याने अापल्या देशसेवेने अापल्या गावचे नाव उज्वल करणार्या भुमिपुत्रास अखेरचा निरोप देण्यासाठी जावली तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिक व जनसागर उपस्थित राहणार असल्यामुळे गावकर्यांनी व युवा वर्गांकडून रात्रभर तयारी केली होती. अंत्यविधीसाठी चौथारा बांधण्यात अाला होता.संपुर्ण परिसर फुलांनी सजवण्यात अाला होता.तसेच सोमर्डी गावाच्या वेशीवर भव्य कमान उभारण्यात अाली होती.तसेच चौका चौकात ‘अमर रहे,अमर रहे,वीर जवान अमर रहे चे फ्लेक्सचे बॅनर लावण्यात अाले होते.गावातील अंत्ययात्रेसाठी जाणार्या रस्त्यावर दुतर्फा रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केली होती.एकूणच संपुर्ण गावासह तालुक्यात भावनिक वातावरण तयार झाले होते.)

0Shares
error: Content is protected !!