IHRA News

IHRA Live News

ज्ञानेश्वरी यशोगाथा

🌿 *ठाणे, श्री सचिन शिंदे*
🍃 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍂 *विभूती योग*
🍃 *अध्याय दहावा*
🍂 *ओवी ७१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌷तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥*
    तरच माझ्यापासून झालेले महर्षी, देव, इत्यादि जीवांना मला जाणण्याला जागा राहील.
*🌿ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥*
      असे जरी आहे तरी कदाचित् बाह्य विषयांकडील धाव निःशेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो.
*🌷प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥*
     इंद्रियांबरोबर विषयाकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करता महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो — म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ती भासली त्या कारणरूप आत्मस्वरूपाचे ठिकाणी जो जातो.
➖➖➖➖🍁➖➖➖
*🌻यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३॥*
अर्थ 👉   _जो मला जन्मरहित, अनादि आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असे जाणतो, तो मानवांमधे ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो_
(मला कसे जाणता येते)
➖➖➖➖🍁➖➖➖
*🌿तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें । अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां ॥७४॥*
      महाभूतांच्या पलीकडे असणारे जे माझे स्वयंप्रकाशित स्वरूप, त्या ठिकाणी स्थिर राहून आपल्या स्वयंप्रकाशरूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो.
*🌷मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें ॥७५॥*
     मी आदिसी पर म्हणजे उत्पत्तीरहित आहे, म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे. असा मी असे जो मनुष्य मला जाणतो.
*🌿तो पाषाणांमाजीं परिसु । रसांमाजी सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥ ७६ ॥*
    जसा पाषाणात परिस श्रेष्ठ आहे किंवा रसात सिध्दरस म्हणजे अमृत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यांत माझा अंश होय, हे जाण.
*🌷तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचेअवयव ते सुखाचे कोंभ । परि माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥७७॥*
     असा मनुष्य, अर्जुना ! ज्ञानाचें चालते बोलते बिंब होय, त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्मसुखाला निघालेले कोंभ होत असे समज, बाकी वर वर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञानभ्रमाने दिसतो.
*🌿अगा अवचिता कापुरा- । माजीं सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ॥ ७८ ॥*
    बा अर्जुना! कापुरामध्ये अकस्मात हिरा मिसळला, तरी त्यावर पाणी पडले असता त्या पाण्याने जसा त्याचा हिरेपणा जात नाही.
*🌷तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥ ७९ ॥*
    त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरूष, जरी या मनुष्यलोकात सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला, तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतीरूप दोषांचा स्पर्शही नसतो.
*🌿तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तैसा मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥*
    भीतीने आपण होऊनच पापे त्यांच्यापाशी येत नाहीत. ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्णस्वरूपाचे पूर्णब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🌸  *ओवी  ८१ पासून उद्या*
🍀  *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!