IHRA News

IHRA Live News

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची किल्ले प्रतापगडाला भेट

बाजीराव उंबरकर महाबळेश्वर
तालुका प्रतिनिधी .

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.

शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपालांची भेट

प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.

शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना अभिवादन अशा भावना त्यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केल्या.

0Shares
error: Content is protected !!