IHRA News

IHRA Live News

आई नसलेल्या मांजरीच्या 2 दिवसांच्या पिल्लांना, इंजेक्शन ने दूध पाजून, जगवण्याचा प्रयत्न करून, प्राणी प्रेमी दिसत आहे.

दि.1
पांचगणी प्रतिनिधी
अमित
पांचगणी भीमनगर मध्ये सुरेश कांबळे. यांच्या घरासमोरील अंगणात एक अनोळखी मांजरीने 3 पिल्लांना जन्म दिला. ज्यांचे अजून डोळे उघडलले नाही . पण दुसऱ्या दिवशी जन्म दिलेली मांजर मरण पावली. व ही बिचारी लहान पिल्ले यांना आई नाही यामुळे भुकेने सतत ओरडत होती. यामध्ये यांचे डोळे अजुन नाही उघडले, खाणार कसे, जगणार कसे, आता या पिल्लांचे काय करायचे यासाठी यांनी प्राणी दवाखाना येथे कळवले, पण एवढ्या लहान मांजरीच्या पिल्लांना संभाळण्यासाठी सुविधा नाही, मोठे आजारी प्राणी यांच्यासाठी आम्ही उपचार करतो असे सांगण्यात आले. यामुळे आता या लहान पिल्लांचे काय व कसे होणार या चिंतेने सविता कांबळे, ( पत्नी ) व सुप्रिया कांबळे ( सुन )यांनी ठरवले की आता आपण प्रयत्न करून तरी पाहू, आणि इंजेक्शन ने दूध दिले. ही लहान पिल्ले दूध पिऊ लागले, आणि शांत झाली. यामुळे सविता कांबळे व सुप्रिया कांबळे यांना खुशी झाली. आणि यांनी ठरवले की आज पासून आपन या पिल्लांचा सांभाळ करूया. मोठे करूया, त्यांचे जीवन त्यांना देऊया. आणि सांभाळ सुरू केलेला आहे. या वरून असे दिसत आहे की अजुन अशी माणसे आहेत, की जी प्राण्यांवर प्रेम करत आहे. प्राणी प्रेमी दिसत आहेत.

0Shares
error: Content is protected !!