IHRA News

IHRA Live News

आडवी बाटली,उभी करणार्यांना नाही राहीला कायद्याचा धाक ? कुडाळ तसेच जावळी तालुक्यातील परिसरात अवैध् व्यवसाय जोमात.

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी कुडाळ तसेच जावळी तालुक्यातील परिसरात अवैध व्यवसाय जोमात सुरु असून युवापिढी या व्यवसायाच्या आहारी गेली आहे.व्यवसायाबरोबच जुगार मटक्याच्या विळख्यात अडकत चाललेल्या युवा पिढीला वेळीच सावरण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस व उत्पादन शुल्क प्रशासनाने अवैध व्यवसायायांना पायबंद घालावा,अशी मागणी सर्व सामान्यांतून होत आहे. कुडाळ परिसरात बेकायदेशीर दारुधंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने तळीरामांना आकाश ठेंगणे झाले आहे.अवैध व्यवसायाच्या विळक्यात आता युवापिढी गुरफटू लागल्याने पालकवर्गाची चिंता वाढू लागली आहे. कुडाळ परिसरात दारुबंदी असताना देखील नवीन नवीन दारु विक्रेत्यांचा उदय होत आहे.मुळातच कुडाळ गावात आधीपासूनच देशी दारुची बेकायदेशीरपणे चालणारी अनेक दुकाने असताना आता तर नव तरुणांनीच या धंद्यात उडी घेतली आहे.दारु बंदी असुन देखील गावामध्ये दारु मिळते कशी ? असा सर्वसामान्यांपुढे प्रश्न पडत आहे.हे बेकायदेशीर दारु धंद्याकडे पोलिसांसह उत्पादन शुल्क जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सर्वसामान्यांतून होत आहे.दारुबरोबर मटका सुरु असल्याने कमी वेळात जादा पैसे मिळवण्यासाठी मटक्याच्या विळाख्यातही युवापिढी गुरफटू लागली आहे.या अवैध धंदा करणार्यांना कायद्याचा धाक राहीला नसल्यामुळे कुडाळ परिसरात दारु मटक्याचे धंदे राजरोसपणे सुरु असल्याचेच दिसून येत आहे.

0Shares
error: Content is protected !!