कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी पुणे बेंगळुर महामार्गावर आनेवाडी व विरमाडे येथील पुलांची अवस्था’रस्ता सहापदरी पण पूल दुपदरी’ अशी झाल्याने या ठिकाणी वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत असून संबंधित रस्ते विकास महामंडळ या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी आणखी किती जीव जाण्याची वाट पाहते,असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.पुणे बंगळुर महामार्गाचे सहा पदरी करणाचे काम अपुर्ण झाले अाहे.मात्र,तरीही भरमसाट टोल देवून प्रवाशांना जीव घेणा प्रवास करवा लागत अाहे.टोल नाका परिसरात असणार्या विरमाडे हद्दीत दोन,तर अानेवाडी हद्दीत एक असे पुल अत्यंत जीव घेणे बनले अाहेत.सहा पदरिकरणाचे काम करताना या जुन्या पुलाची लेन न वाढवता रस्ता सहापदरी केल्यामुळे वाहनांना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे आठवड्याला होणारे जीवघेणे अपघात ही संबंधित कंपनी मोजत बसली आहे की काय ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. लिंबच्या गौरीशंकर कॉलेज पासून असणारा तीव्र उतार हा आनेवाडीच्या उड्डान पुलापर्यंत येतो. महामार्गावर होणार्या अपघातांपैकी महिन्याला किमान 10 ते 12 अपघात हे या आनेवाडी व विरवाडे पुलावर होतात. यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे हा खूप धोकादायक असा पुल आहे.महामार्गाच्या सहापदरीकरण कामात योग्य नियोजन न करता केलेल्या कामामुळे स्थानिक प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे साताराचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी आता याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा व संबंधित कंपनी निकृष्ट कामामुळे झालेल्या घटनेची माहिती घेऊन कारवाई करावी. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.असा लोकांमधून नाराजीच सुर निघत अाहे.
महामार्ग सहापदरी अन् पूल दुपदरी !

More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ