कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
कुडाळ तसेच जावळी तालुका हा संपुर्ण परिसर डोंगर दर्यानी नटलेला व निसर्गाच्या कुशीत वसलेला भाग, इतिहास,पराक्रमाची भुमी परंतू या भागाला प्रत्येक वर्षी वनव्याच्या स्वरुपात नजर लागते. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात.यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो.सध्या ऊन्हाची तीव्रता वाढत अाहे.तसे डोंगरांना अागी लावण्यामागे अनेक गैरसमज/कारणे अाहेत गवत पेटल्याने पुढील पावसाळ्यात चांगले गवत ऊगवते म्हणून शेतकरी अाग लावतात पण प्रत्यक्षात अागीमध्ये वाढलेले गवत अाणि त्याचे बी पुर्ण पणेे जळुन जाते त्यामुळे चांगले गवत कमी कमी होत जावून तणांचीच वाढ जास्त होते.वनविभागाचे अधिकारी रस्त्यालगत,रोपवणागत जाळरेषा घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात पण काही विकृती रस्त्यालगत मद्यपान,शौचविधीसाठी जंगलात जावून शिगारेट,विडी जाळून अाग लावून निघुन जातात यात जंगलातील नवीन रोपे, गवत,वन्यजीव यांची अतोनात हानी होते.शिकारीसाठी झुडपे,कपारी मध्ये अाग लावून वन्यजीवांना लपून क्षेत्रातून बाहेर काढून मारणेसाठी डोंगर पेटवले जातात.हे अतिशय क्रूरपणे घडते.डोंगरातून जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी सरपण गोळा करण्यासाठी सोपे जावे.यासाठी डोंगर पेटवतात.भारतीय संविधानानुसार पर्यावरण संरक्षण ही अापली जबाबदारी अाहे.अापल्या पुढील पिढ्यांसाठी वने वाचली पाहिजे म्हणून निदान ज्यांना अाग दिसते जे जंगलाचे जवळ राहतात त्यांनी तरी अाग विझविण्यास मदत करणे अावश्यक अाहे.रात्रीचे ऊंचावर जावून पाहिले की चारही दिशांना कोठे ना कोठे डोंगर पेटलेली दिसतात याचे दुष्परिणाम गुरांचा चांगला चारा नष्ट होतो नविन व जुनी रुजलेली झाडे व रोपे नष्ट होतात.वन्यप्राणी सरपटनारे प्राणी, पक्षीजीवन बाधित होते.जमिनीचे गवताचे अाच्छादन नष्ट होते. यामुळे मातीची धुप होते.पाण्याची धारण करण्याची जमिनिची क्षमता नष्ट होते यामूळे खडक उघडे पडतात या प्रकारे थोड्याशा नजर चुकीमुळे व बेजाबदार वागण्यामूळे अापण अापल्या पर्यावणाचे व सामाजिक नुकसान करत अाहोत.नुसते वनखात्यावर जबाबदारी झटकून अनेकजण वनव्याकडे दुर्लक्ष करतात.डोंगरात दुष्काळावर मात करेल एवढा चारा आहे.पण काही समाज विघातक प्रवृत्तीमुळे व वरील गैरसमजामुळे अापण वनव्याला बळी पडत अाहोत.आग लागलेली विझवण्सासाठी चला म्हणल्यावर आमचा काही फायदा नाही आमची गुरे नाही जात जंगलात,आम्हाला नाही लागत तुमचे सरपण असे सांगून आग विझवायला यायचे टाळतात.वन खात्याचे अपुरे कर्मचारी एका कर्मचाऱ्याकडे दहापेक्षा जास्त गावे आणि हजारो हेक्टर वनजमीन,बातमी मिळाल्यावर घटनास्थळावर जाईपर्यंत लागणारा वेळ तसेच यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसतात. आजूबाजूला पानगळ झाल्याने आग विझवायला पाला ही नसतो.तरी सुध्दा वनकर्मचारी पर्यावरण मित्र आपले प्रयत्न सोडत नाही कड्या कपारीत डोंगरउतारावर रात्रीच्या वेळी जाऊन आग विझवण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करतात जे उपलब्ध होईल त्यांने आग आटोक्यात अाणायचा प्रयत्न करतात तो पर्यंत बरेच क्षेत्र जळालेले असते.आजूबाजूचे लोक आपले सामाजिक भान विसरून पहात बसतात आणि फक्त रान पेटलं म्हणून चर्चा करतात. पण यापासून आपण पुढील पिढीचा अमूल्य ठेवा नष्ट करुण पर्यावर्णाची हानी करत अाहोत.हे विसरून जात आहोत.यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.गावातील तरुणांनी पर्यावरण दलांची स्थापना करायला पाहिजे आपला डोंगर पेटलेला दिसल्यास वनखात्याला खबर करून गावातील तरुणांनी त्वरित डोंगराकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणायला पाहिजे.यातून अापल्याला चांगले जंगल तयार होईल परंतु हे सामाजिक प्रयत्ना शिवाय शक्य नाही,वनवा लागू नये म्हणून आपण खालील काळजी घ्यावी वना लगत आपला शेतीचा बांद शेतातील कचरा ऊसाचे पाचट जाळताना प्रथम आपल्या नजीकच्या वन अधिकारी यांना सूचना द्या वनात फिरायला जाताना अग्निजन्य वस्तू नेवु नयेत,जंगलात किंवा जंगलातून जाणार्या रस्त्याने सिगरेट ओढू नका,कोणत्याही कारणाने आग लावायचा प्रयत्न करू नका,वनालगत असणारे शेतकरी ग्रामस्थ यांनी वनात फिरणारे संशयास्पद टवाळखोर शिकारी यांची खबर माहिती वनरक्षक यांना द्यावी जंगलात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात त्यामुळे आपल्या बोअरवेल विहीर यांना पाणी वाढते गवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही त्यामुळे उन्हाची तीव्रताही कमी होण्यास मदत होते गुरांना कापून न्यायला चारा उपलब्ध होतो अनेक प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात पशुपक्षी यांना निवारा मिळाल्याने निसर्गचक्र सुधारते व बराच काल जंगलात पाणी उपलब्ध पर्यावरण रक्षणासाठी जंगले अागीपासून वाचवने ही सर्वांची सामाजिक जबाबदारी अाहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ