IHRA News

IHRA Live News

महामार्गाचा सर्व्हीस रोड बनला पार्कींग झोन.सेवा रस्त्यावरील प्रवास धोकादायक!

कदिर मणेर/प्रतिनिधी सातारा

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर पाचवड ते सातार्यापर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर वाहने पार्कींग केली जात आहेत.यामुळे सर्व्हीस रोडवरुन वाहतूक करणे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरत झाली असून सेवा रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.

पाचवड ते सातारा या महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर मोठ्या प्रमाणत अनेक हाॅटेल्स,गॅरेज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय मोठ्या स्वरुपात थाटले आहेत.मात्र,त्यांनी गाड्या पार्कींगची व्यवस्था न केल्याने त्या ठिकाणी कामानिमित्त येणारे लोक आपली वाहने महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर लावून जात आहेत. सुमारे तास दोन तीन तास ही लोकं माघारी येत नसल्याने मोठी अडचण होत आहे.या शिवाय अनेक वाहने दुरुस्तीच्या कारणाने सर्व्हीस रोडवर पार्कींग केली आहेत. ती वाहने जवळपास दहा ते पंधरा दिवस तर काही वाहने महिना महिना तशीच सर्व्हीस रोडवर पार्क केल्याने सर्व्हीस रोड जवळपास अर्धा व्यापला जात आहे.त्यामुळे सर्व्हीस रोडवरुन वाहतूक करणे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.वाहने पार्कींगमुळे सर्व्हीस रोडचा मूळ हेतूच बाजूला पडला आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी सर्व्हीस रोडवर कारणाशिवाय वाहने पार्कींग होत आहेत आश्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार होत आहे.

0Shares
error: Content is protected !!