IHRA News

IHRA Live News

*पांचगणी सिद्धार्थनगर येथील नागरिक आरोग्य दवाखाना म्हणजे नक्की काय पांचगणीकरांची दिशाभूल
महाबळेश्वर प्रतिनिधी .
बाजीराव उंबरकर.
पांचगणीकरांनी याचा नीट विचार करावा. सिद्धार्थनगर येथे होणाऱ्या नागरिक आरोग्य दवाखाना म्हणजे काय? *नागरिक आरोग्य दवाखाना (फक्त OPD) म्हणजे सकाळी १० वाजता एक शिकाऊ डॉक्टर व एक नर्स येणार आणि ते ४ वाजता जाणार* ही योजना फक्त आणि फक्त दुर्गम भागात राबविली जाते. दुर्गम भाग म्हणजे डोंगराळ भाग. जिथे गाडीची व्यवस्था नाही. त्या गावातील लोकांना *साध्या आजारा साठी म्हणजे सर्दी, खोखला किंवा साधा ताप या करिता १० ते १५ किलोमीटर* अंतरा पर्यंत चालत जावे लागते. अशा ठिकाणी ही योजना राबविण्यात येते. पण *पांचगणी सिद्धार्थनगर येथे नागरिक आरोग्य दवाखान्याचे चाललेले राजकारण* हे खूप वाईट आहे. कारण हे फक्त निवडणूकी साठी खेळ सुरू आहे. आणि हा खेळ *फक्त ५ ते ६ महिने सुरू राहणार. आणि ७८ लाखाचा पूर्ण धुरळा होणार* मग आता जे पुढे पुढे करतायत ते या विषयावर फक्त गप्पा मारणार *आज डॉटर नाही आले आज नर्स नाही आल्या. म्हणून OPD बंद* आहे. असे सांगून टोलवा टोलवी केली जाणार. आणि थोड्या दिवसाने *नागरिक आरोग्य दवाखाना हा बंदच होणार* जर असे होणारच आहे. व ७८ लाखाला चुनाच लागणार आहे. तर हे असे होहू नये म्हणून, हे ७८ लाख रुपये *पांचगणी येथे शासनाचे असणारे ग्रामीण आरोग्य केंद्र* याच्यावर खर्च करून त्या रुग्णालयात उपचारासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. *जसे ICU, OXYGEN, BED व अनुभवी डॉटर* जनेकरून सर्वसामान्य नागरिकांना प्रायव्हेट दवाखान्यात हजारो ते लाखो रुपये खर्च करावे लागणार नाहीत. म्हणजे *खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना त्याचा उपभोग घेता येईल* शासकीय अधिकाऱ्यांनी उगाचच राजकारन्यांच्या नादाला लागून लोकांच्या भविष्यासाठी येणाऱ्या शासनाच्या फ़ंडाचा चुकीचा वापर करू नये. आणि *महत्वाचे म्हणजे हया योजनेला शासणाच्या तिजोरीतुन ७८ लाख देणार आहे. व या साठी कोणीही प्रयन्त केलेले नाहीत* आणि या योजनेशी *पांचगणी नगरपालिकेला कसलाही सबंध नाही* कारण ही योजनाच शासनाची आहे. तेव्हा कुणीही ही योजना मी आणली.मी खुप प्रयत्न केले. असे सांगून सिद्धार्थनगर येथील नागरिकांची दिशाभूल करू नये.

*दिपक प्रभु कांबळे उपाध्यक्ष सातारा जिल्हा वंचित बहूजन आघाडी*

0Shares
error: Content is protected !!