IHRA News

IHRA Live News

संकेत चव्हाण
सातारा प्रतिनिधी

*रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि मशाल दौड चे आयोजन*

सातारा – *दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाई येथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिवजयंती उत्सव आणि भव्य मशाल दौड त्याचबरोबर विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना ही छत्रपती शिवरायांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केली असून मागील दोन वर्षात त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी *भव्यदिव्य शिवजयंती* दक्षिण काशी वाई येथे सुरू करून इतिहास निर्माण केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, गडकिल्ले संवर्धन व त्यांचे जतन करण्याचा विडा, मासिक पाळी बद्दलचे गैरसमज, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्या बद्दल माहिती पुरवणे अशी अनेक कामे संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी शुक्रवार दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी किल्ले सज्जनगड ते दक्षिण काशी पर्यंत मशाल दौडचे सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. शनिवारी शिवजयंती उत्सव कार्यक्रमावेळी शिवरायांच्या वेळी स्वराज्य निर्माण करताना कोणत्या शस्त्राचा वापर केला गेला हे सर्वसामान्यांना समजावे यासाठी “शस्त्र प्रदर्शन” , महिलांसाठी सॅनिटायझर नॅपकिनचे मोफत वाटप कार्यक्रम, शिव व्याख्याने, रक्तदान शिबिर, महिलांची हिमोग्लबिन तपासणी तसेच अनेक कार्यक्रम होवून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री मा. शंभूराजे देसाई, आमदार मा. मकरंद आबा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असे संस्थेच्या अध्यक्षा अश्विनीताई महागंडे आणि कार्याध्यक्ष निलेश जगदाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

0Shares
error: Content is protected !!