IHRA News

IHRA Live News

महाबळेश्वर पांचगणी हिल स्टेशन येथे अनाधिकृत बांधकाम माफियांचा सुळसुळाट प्रशासन गांधारीच्या भुमिकेत.

महाबळेश्वर प्रतिनिधी .
बाजीराव उंबरकर .
महाबळेश्वर तालुक्यातील हिल स्टेशन पांचगणी येथे अनाधिकृत बांधकाम माफियांचा सुळसुळाट. बांधकाम माफिया हे काही मर्जीतील आधीकारी यांच्या सोबत हात मिळवणी करून मोठ्यप्रमाणावर ईमारती उभारत असून अनाधिकृत बिन परवाना ऊत्खन्न करत असून ही बाब कोणाच्याही लक्षात येत नाही. आपल्या
प्रशासनाचे आधिकारी समोरूनच ये जा करत आहेत .तरी सुद्धा कोणाच्याही लक्षात मात्र येत नाही किंवा कोनाचेही लक्ष्य माफियांच्या अनाधिकृत बांधकामाकडे व अनाधिकृत उत्खनन चालू आहे तिकडे
जात नाही .कारण असे तर नाही ना प्रतेकाने आपआपले खिसे गरम करुन बसल्यामुळे निवांत झोपेचे सोंग घेतले आहे .अजुन किती दिवस झोपेचे सोंग घेनार आहेत .या गांधारीच्या भुमिकेतील कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करून त्यांची झोप उडवली पाहीजे .या बांधकाम व्यावसायिकांना परमिशन कोन्ही दिले उत्खनन करायला किती उत्खनन केले या बांधकाम माफियांच्यावर कोनाचा वरदहस्त आहे .कोनाच्या आदेशानुसार उत्खनन बांधकाम चालू आहे.याची प्रशासनाने शहानिशा करून या मधे जे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे त्याच्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी पांचगणी शहरातील जनसामान्यातुन कुजबूज चालू आहे.सर्व सामान्य नागरिकाला दहा वेळा कर्मचारी ऑफिसात चकरा मारून एका गुंठ्याचे परमीशन मिळत नाही. आणी या बांधकाम माफियांना परमिशन मिळते कसे असा चर्चेचा विषय बनला आहे.तरी संबंधित विभागाने त्वरीत लक्ष केंद्रित करावे
जन हितार्थ जारी.

0Shares
error: Content is protected !!