IHRA News

IHRA Live News

आमदार ‌‌शशिकांत शिंदे चषक २०२२ एबीसी क्रिकेट क्लब कुडाळ संघाने तृतीय क्रमांक पटकावला !

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी.
कुडाळ (ता,जावळी)मध्ये गेल्या चार दिवसांपासून आमदार शशिकांत शिंदे साहेब चषक क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली.आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये चार सामन्यांच्या प्रमुख लढती होत्या,हुमगाव,कुडाळ,केळकर,अोकडी हे संघ होते यांच्या मध्ये सेमी,फायनल लढती होत्या या लढतींचा थरार पाहण्यासाठी कुडाळ तसेच परिसरातील क्रिकेट प्रेमींची खुप मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती अाणि या लढती देखील तुल्यबळ झाल्या. या स्पर्धेत फायनल सामना हूमगाव विरुद्ध केळघर या दोन संघांचा झाला या अटीतटीच्या सामन्यात हुमगाव संघाने केळघर संघावर मात केली व आमदार चषकावर आपले नाव कोरले.विजेत्या संघाला माथाडी कामगार नेते ऋशिकांत शिंदे यांच्या हस्ते अा.चषक देण्यात अाला.

एबीसी क्रिकेट संघ कुडाळ संघाला हुमगाव संघाबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले त्यामूळे कुडाळ संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानवे लागले. या क्रिकेट स्पर्धेमुळे जावळी तालुक्यातील पुर्ण वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.आमदार चषक २०२२ या स्पर्धेसाठी शशिकांत शिंदे आणि त्यांचे भाऊ ऋशिकांत शिंदे तसेच साहेब व ऋशिभाई यांचे कट्टर समर्थक.अत्यंत विस्वासू समीर डांगे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच नेटके नियोजन केले.

अा.चषक २०२२ च्या अनुषंगाने जणू आ.शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात राष्ट्रवादी चा पाया मजबूत करण्यासाठी रणशिंग फुंकले असल्याची चर्चा पूर्ण जावळी तालुक्यात होत आहे.

0Shares
error: Content is protected !!