IHRA News

IHRA Live News

स्किल पार्क सेलू येथे वृक्षारोपण(किड्स फाउंडेशन व नगरपंचायत सेलू यांचा संयुक्त उपक्रम)

दिपाली चौहन/प्रतिनिधी (जिल्हा वर्धा)१३/०२/२०२२

आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोज रविवारला स्किल पार्क, सेलू येथे किड्स फाउंडेशन वर्धा व नगरपंचायत सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच स्किल पार्क विकासासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करून त्यांना पाणी देण्याची पुढील सोय करण्यात आली. उन्हाळ्यामध्ये रोपटे जगावे या करिता प्लास्टिक बॉटल च्या मदतीने ठिबक सिंचन प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे कमी पाण्यामध्ये झाडे जगण्यास मदत होईल.
वृक्षारोपण कार्यक्रम सोबतच सदर परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर स्किल पार्कमध्ये योगासन व प्राणायाम शिबिर घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.
वृक्षारोपण व स्वच्छता कार्यक्रम या मध्ये नगरपंचायत मधील कार्यालय अधीक्षक रघुनाथ मोहिते, प्रशांत रहांगडाले, हेमंत नाईकवाडे व सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे किड्स फाउंडेशन वर्धा चे डॉ. गिरीश वैद्य, स्वप्नील वैरागडे, शरद ढगे, मिनल गिरडकर, प्राजक्ता मुते, उल्हास राठोड, पवन बानोकर, सोनटक्के सर आदी सदस्य उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!