IHRA News

IHRA Live News

ए.टि.एम. (डेबीट कार्ड) अदला-बदली करुन आर्थीक फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार सायबर शाखा, वर्धा कडुन अटक आरोपीकडुन वर्धा जिल्ह्यातील २ गुन्हे उघड

दिपाली चौहन / प्रतिनिधी/(जिल्हा वर्धा)१०

फिर्यादी श्रीमती सरोज गणेश सतिजा, वय ६१ वर्ष, रा. मालगुजारीपुरा वर्धा ह्या मगन संग्रहालया जवळील स्टेट बँकेच्या ए.टि.एम. मध्ये पैसे काढण्याकरिता गेल्या असता तेथे एका अनोळखी इसमाने त्यांना एटीएम मधून पैसे काढण्याकरिता मदत करतो असे सांगितल्याने फिर्यादी यांनी सदर अनोळखी इसमास त्यांचे एटीएम कार्ड पैसे काढण्याकरीता दिले असता सदर इसमाने फिर्यादी यांचे एटीएम कार्डचा गोपनीय पिन माहिती करून घेतला व फिर्यादी यांचे एटीएम कार्ड बदलवून त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले. काही वेळाने फिर्यादी यांचे मोबाईलवर ए.टि.एम. मधुन पैसे काढल्याबाबत मॅसेज आले व फिर्यादी यांचे बँक खात्यातुन एकुण ७९८४८/- रु. डेबीट झाले. कोणीतरी अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे ए.टि.एम. कार्डची चोरी करुन फिर्यादी यांचे खात्यातुन नगदी रुपयाची चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे तक्रार दिल्याने अप.क्र. ११५/२०२२ कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर शाखे मार्फत सुरू असतांना मुखबीरकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन टाकळघाट, जि. नागपूर येथून आरोपी अनुप शिवनारायण पाझारे, वय ३४ वर्ष, रा. सावित्रीबाई फुले नगर, गली नंबर 3, संत गाडगे बाबा मार्ग, नागपूर, ह.मु. C/o श्री. सागर करमरकर यांचे फ्लॅट क्रमांक २०७, माया टाऊन, गोंडवाना पिपरी, टाकळघाट, जि. नागपूर यास ताब्यात घेवून त्याचे जवळून १) वेगवेगळ्या बँकेचे एकुण 13 ए.टि.एम. कार्ड, २) एक वापरता ओप्पो कंपनीचा मोबाईल कि. १५,०००/- रु. जप्त करुन त्यास सखोल विचारपूस करण्यात आली असता त्याने देवळी जि. वर्धा येथे सुध्दा अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी कडुन पो.स्टे. वर्धा (शहर) अप.क्र. ११५/२०२२ व पो.स्टे. देवळी अप.क्र. ३७ /२०२२ असे दोन गुन्हे उघडकिस आणले आहे. आरोपीने अशाप्रकारचे गुन्हे कळंब, यवतमाळ, चिमुर, कामठी येथे केल्याचे सांगितले आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार गजानन लामसे, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, शेखर डोंगरे, पो.स्टे. हिंगणघाट, रितेश शर्मा, अंकित जिभे, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, यशवंत गोल्हर, गोपाल बावणकर, शाहिन सैय्यद, स्मिता महाजन, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पार पाडली आहे.

0Shares
error: Content is protected !!