कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
वाई पाचवड महामार्गावरील इनामदार गॅरेज समोर एका भरघाव वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यावरील दोन जण जागीच ठार झाल्याची नोंद वाईत पोलिस ठाण्यात झाली आहे. तर अपघात करून संबंधित वाहन पळून गेल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई पाचवड रस्त्यावरील इनामदार गॅरेज समोर दुचाकीवरून अनिकेत संतोष चव्हाण वय २२ वर्ष राहणार अोझर्डे गोसावी वस्ती तर दुसरा राम सदानंद महांगडे वय १२वर्षे मूळ राहणार सर्कलवाडी ता. कोरेगाव सध्या राहणार कला गार्डन घाटे कॉलनी वाई असे दोघे जण जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार झाले. पण डंपर आणि त्यावरील चालक न थांबताच पळून गेल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, बाळासाहेब भरणे यांना समजतात त्यांनी सपोनि रविंद्र तेलतुंबडे, हवालदार वरकडे, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, सुमित मोहिते,यादव, प्रसाद दुदुस्कर या पोलिस पथकाला पळून गेलेल्या डंपर आणि चालकाचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. या पथकाने अखेर काही वेळातच डंपरचा शोध लावला अाहे.त्याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ