IHRA News

IHRA Live News

वाई स्वराज होंडा बाईक शोरूम, वॉरंटी मध्ये जबाबदारी घेत नाही.

दि. 22
अमित कांबळे
पांचगणी

वाई स्वराज होंडा येथुन नवीन बाईक 2021 रोजी उमा परमार यांनी होंडा लिवो बाईक खरेदी केली असता. 6 महिन्यामध्ये बाईक ची बॅटरी खराब झाली असुन ही बॅटरी 27 नोव्हेंबर 2021 ला वॉरंटी मध्ये वाई स्वराज होंडा येथे, दिली असुन आज 22 जानेवारी 2022 रोजी दोन महिने पुर्ण होयला आले असून देखील, बॅटरी परत मिळाली नाही. आज अखेर 4 वेळा स्वराज होंडा येथे भेट दिली असता , बॅटरी सातारा ला पाठवली आहे, अजुन आली नाही , जशी येईल तसे कॉल करू असे सांगुन टाळाटाळ करत असल्याची प्रकार होत आहे. आणी आज अखेर वाई स्वराज होंडा येथुन अजुन कॉल आला नाही . आणी बॅटरी बदलुन मिळत नाही. त्याच बरोबर बॅटरी च्या बदली बॅटरी काही दिवस वापरण्यासाठी सुद्धा बॅटरी दिली नाही. नेमका काय प्रकार आहे ? का फसवणुक होत आहे का ? का बॅटरी देयची नाही का ? का बॅटरी चे पैसे पाहिजे आहे ? का आलेली बॅटरी विकली का ? का सामान्य जनता आहे म्हणुन हा त्रास होत आहे का ? असा शंका होत आहे. तसे तर बॅटरी खराब झाली तर जोपर्यंत बॅटरी मिळत नाही तोपर्यंत बॅटरी वापरण्यास मिळायला हवी पण तसे झाली झाले नाही. ही तर फसवणूकच आहे.

0Shares
error: Content is protected !!