IHRA News

IHRA Live News

पूणे-बेंगलोर महामार्गाची दयनीय अवस्था

आसिफ मणेर
प्रतिनिधी
कुडाळ पाचवड

दि. २३/०१/२०२२
पूणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. या महामार्गावर रोज लाखो वहाने प्रवास करत असतात. देशाला जोडनारा महामार्गाची सद्ध्याची स्थिती ही खूप वाईट आहे. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत असलेले रिफ्लेक्टर्स खराब झाले आहेत. एकीकडे शासनामार्फत दर वर्षी रोड सेफ्टी पंधरावडा पाळला जातो. मात्र दूसरीकडे रस्त्याच्या दूरुस्तीकडे काना डोळा केला जात आहे.
जनतेकडून अमाप वाहन कर आकारला जातो आणि भरमसाट टोल वसुली केली जाते. परंतु त्या तुलनेत सूविधा दिल्या जात नाहीत. या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपासुन सोशल मीडियावर या महामार्गाला ‘नाईटमेयर’ म्हणजे वाईट स्वप्न असे म्हटले जात आहे. कारण खराब रस्त्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

0Shares
error: Content is protected !!