IHRA News

IHRA Live News

अमित कांबळेपांचगणीदी. 19रि.पा.ईच्या (आठवले) दणक्याने पाचगणी मुख्याधिकारयांचा नगरपालिकेतून पळ

पांचगणी,महाबळेश्वर तालुक्यातील टेबललँड या पॉईंट वरील दुकाने व्यवसाय कोरोनाचे कारणावरून पाचगणी नगरपालिकेने काही दिवसांन पासून बंद ठेवले आहे.
सदर दुकानदार व्यवसायिकांचे बाजूने आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा.अशोकबापू गायकवाड
पश्चिम महाराष्ट्र युथ अध्यक्ष-स्वप्निल गायकवाड
महाबळेश्वर तालुका अध्यक्ष-जॉन जोसेफ
तालुका कार्याध्यक्ष-अतिष भोसले
शहर अध्यक्ष-साजिद क्षीरसागर
तसेच टेबललँड वरील दुकानदार,व्यवसायिक हे पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटण्या करीता गेले असल्यास अनपेक्षित कारणे देत त्यांनी भेट टाळली.
जिल्हा अधिकारी यांनी प्रसारित केलेल्या कोरोना निर्बंध नियमांना पांचगणी मुख्य अधिकारी यांच्या कडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे असे आरोप मा.अशोकबापू गायकवाड यांच्या कडून करण्यात आले.पांचगणी मधील मोठे हॉटेल बिनदास्त पणे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत,तसेच आठवडा बाजार जो नगरपालिकेच्या दारात बसतो तो सुद्धा पूर्ण सुरू आहे
या बाजारात शोषल डिस्टन्सीइंग च्या फज्जा उडालेला स्पस्ट दिसतो त्या वेळी पाचगणी मुख्य अधिकारी कुठे असतात असा सवाल त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले जर लवकरात लवकर टेबललँड वरील दुकानदारांच्या प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि त्यांच्याकडे आत्मदहन करण्या शिवाय पर्याय उरणार नाही तरी लवकरात लवकर यांचा उपजीवकेचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा त्यांना इच्छामरण करण्याची परवानगी द्यावी
असा मागणी अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)गटाच्या वतीने पांचगणी नगरपालिकेला करण्यात आला.

0Shares
error: Content is protected !!