IHRA News

IHRA Live News

महामार्गावरील थांबे बनले धोकादायक.

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी

महामार्गावर असलेले अनाधिकृत थांबे धोकादायक असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

सातारा शहर परिसरातून कराड,कोल्हापूर,पुणे, शिरवळ असा दररोज प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बसस्थानकावर जाण्यापेक्षा अापल्या निवासापासून जवळचा अाणि सोयीची जागा असलेल्या ठिकाणी महामार्गावर थांबतात.तसेच मिळेल त्या वाहनाने इच्छित स्थळापर्यंत प्रवास करणारे प्रवासीही अाहेत.त्यामुळे अनाधिकृत थांबे वाढले अाहेत. मात्र महामार्गावर धावणारी सर्व वाहने वेगात असतात.रस्त्यात कोणी अाडवे अाले असता अतिवेगातील वाहनांना ब्रेक लावणे शक्य होतेच असे नाही.त्यामुळे बर्‍याचदा रस्ता ओलांडणाऱ्या किंवा रस्ता कडेला थांबलेल्या प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत अाहे.अात्तापर्यंत बरेचदा अपघात होवून बर्याच लोकांना अापला जीव गमवावा लागला अाहे. त्यामुळे असे अनाधिकृत थांब्यावर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी तसेच लोकांमधून होत अाहे.

0Shares
error: Content is protected !!