IHRA News

IHRA Live News

वसीम डांगे याने भाला फेक व गोळा फेक क्रीडा प्रकारात पटकावले सिल्वर मेडल,

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी. सातारा येथील शाहू स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हा पॅरालिंपिक स्पर्धेत कुडाळ तालुका जावळी येथील वसीम शौकत डांगे याने भाला फेक व गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये सिल्वर मेडल पटकावले.या कामगिरीच्या जोरावर वसीम डांगे याची गोंदीया येथे पार पडणार्या राज्यस्तरीय पॅरालिंपिक अाॅलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली.अाणि या गोंदीया येथील स्पर्धेतूनच राष्टीयस्तरावर या क्रिडा प्रकारातील विजय झालेल्या खेलाडूंची निवड होणार अाहे. या मिळालेल्या यशामुळे वसीम डांगे यान अागामी काळात अाॅलंपिक मध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला.या स्पर्धेतील कामगिरीमुळे गावातील नागरिक,मित्र परिवार,नातेवाईक या सर्वांनी कौतूक व अभिनंदन केले. तसेच मुस्लिम समाजातील नसीरभाई डांगे,समीर अातार,समीर डांगे,अलताफ अातार,अासिफ मणेर यांच्यासह सर्व मुस्लिम समाजाने देखील अभिनंदन केले.
0Shares
error: Content is protected !!