IHRA News

IHRA Live News

शरद पवार व रयत वर टीका करण्यापुर्वी अापली उंची तपासा;शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेवर हल्लाबोल.

शरद पवार व रयत वर टीका करण्यापुर्वी अापली उंची तपासा;शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेवर हल्लाबोल.

कदिरमणेर/सातारा प्रतिनिधी

शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. त्याचे कारण ठरले रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार.आ.महेश शिंदे मागील काही दिवसांपासून सातत्याने रयत शिक्षण संस्था यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत.यावर शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी.

शशिकांत शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठा व्हावा,या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली होती.सध्याच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात ही संस्था टिकवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केले. संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरु केले आहेत.शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाली आहे.अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत,परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयत मधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना याचे भान ठेवावे,असाही सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले,केवळ शरद पवार यांचा पाठिंबा आहे,म्हणून ही संस्था आधुनिकतेच्या पायावर उभी असून यशस्वी वाटचाल करत आहे. या संस्थेमुळे सातारा शहरासह जिल्ह्याचा दर्जा सुधारला आहे. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थत योगदान दिले आहे,त्याप्रमाणे राज्यातील व देशातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.देशाचे पंतप्रधान ही त्यांचे कौतुक करतात.शरद पवार,संस्थेची पवित्रता व नावलौकिक बिघडविण्याचे काम काही वाईट विचाराचे लोक करत आहेत. सत्तेच्या माध्यमातून मिळालेली संधीत नेत्यांविषयी भान ठेऊन बोलण्याची तुमची संस्कृती नाही,हे आम्ही सांगणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवार यांचे योगदान किती आहे,हे लक्षात घेऊन मगच त्यांनी बोलावे. त्यासाठी आपण रयत शिक्षण संस्थेच्या एका वार्षिक सभेला उपस्थित राहावे.त्यांचे व्हिजन पहावे. त्यात कमी वाटत असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी किंवा रयत परिवाराकडून तुम्ही माहिती घ्यावी. राजकारणात कार्यरत असताना काही ठिकाणी काम करायला संधी मिळते. त्यावेळी चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून तिची नाहक बदनामी करू नका.अन्यथा,तुमचे स्वतःचे राजकारण संपेल,असा सल्ला आमदार शशिकांत शिंदे यांनी केली दिला आहे.

0Shares
error: Content is protected !!