कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
कोरोनाच्या अाव्हानात्मक परिस्थितीतही कुडाळ केंद्रशाळेने शिष्यवृती परीक्षेत ऐतिहासिक रेकाॅडब्रेक कामगिरी केली अाहे.कुडाळ केंद्रशाळेला पूर्व माध्यमिक शिष्यवृती परिक्षेत जावळी तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृतीधारक होण्याचा मान मिळाला अाहे.
शिष्यवृती धारक विद्यार्थी……तन्मय संतोष जोशी-२५४,अार्यन गणेश वारागडे-२५४, वैष्णवी शरद नलवडे-२४८,अार्या सचिन माळेकर-२४८, हिना मोहम्मद अन्सारी-२३४,सिध्दी संतोष पोफळे-२२८, प्रांजली कोरडे-२२४, या विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्री. अरविंद दळवी,केंद्रप्रमुख(कुडाळ),मुख्याध्यापिका सौ.जयश्री गायकवाड,तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून सौ.राजश्री शिंदे,श्री.बन्सीधर राक्षे,श्री.संदिप शिर्के,सौ.दिपाली कुंभार या शिक्षकांनी खुप परिश्रम घेतले अाणि श्री.संजय शिंगटे,सौ.जोत्स्ना वायदंडे,श्री.रघुनाथ जाधव,सौ.शुभांगी तरडे,सौ.मेघा चव्हाण,सौ.शोभा फरांदे,सौ.अर्पिता मोरे,सौ.निलम पवार,सौ.स्वाती बारटक्के या शिक्षक शिक्षीकांच देखील सहकार्य विद्यार्थ्यांना राहीले.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थांनी या मुलांचे कौतूक केले अाणि शुभेच्छा दिल्या.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ