वर्धा 2:- प्रतिनिधी दिपाली चौहान
दिनांक १/०१/ २०२२ रोजीदरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा शिव संस्कार ग्रुप तर्फे शारदा मुकबधिर विद्यालय, श्रीछाया बालगृह ,उष:काल बालगृह आणि अंधविद्यालय (नालवाडी) वर्धा येथे नववर्षानिमित्त्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावर्षी कार्यक्रमाचे ७ वे वर्ष होते, गेल्या ७ वर्षांपासून शिवसंस्कार ग्रुप तर्फे हा कार्यक्रम सातत्याने अयोजित करण्यात येतो. कोरोना काळात सर्व काही बंद होत, कोणाशी संपर्क नाही काही नाही पण नवीन वर्षाच्या निमित्याने मुलांना भेटून व शुभेच्छा देऊन व सर्व काळजी घेऊन मास्क, सॅनिटाईझर चा उपयोग करून कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे अनिकेत भोयर,संकेत भुरे यांनीं कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर प्रकारे केले होते
मुला-मुलींसाठी सकाळी 9 वाजता (हेल्थ चेकअप कॅम्प) ठेवून या कार्यक्रमाला सुरुवात होते.
तसेच संध्याकाळला त्या मुला-मुलींना काही भेट वस्तू आणि उपयोगी वस्तू देण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी मनोरंजना करिता डिजे सुध्दा बोलविला होता. तसेच सर्वांनसाठी जेवनाची व्यवस्था केलेली होती. कार्यक्रम खुप आनंदात व उत्साहात पार पडला, सर्व मुलांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.(एकशाम अनाथ बच्चों के नाम ). ह्या वाक्यातच बालकांचे आनंद आपल्याला लपून दिसते परंतु हे आनंद शिव संस्कार ग्रुपच्या माध्यमातून दर वर्षी या बालकांना मिळतो यांच्या या कार्यासाठी या गुपच्यादस्यांचे या सर्व मान्यवरांनी अतिशय कौतुक केले.
या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी श्री. अभ्युदयजी मेघे साहेब(आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय ,सावंगी, वर्धा) हे उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये मा. प्रमुख पाहुणे म्हणून, मा.डॉ. उषा ताई फाले मॅडम, मा.मनीषा ताई मेघे, मा.डॉ. प्राजक्ता झाडे, मा.माधुरी मॅडम महाकाळकर ,दिपाली परमार मॅडम, स्वप्नील मानकर सरांनी, भोयर मॅडम, ,सागर घाटे,शैला दाते यांनीं उपस्थिती दर्शवली.
तसेच शिव संस्कार ग्रुपचे सदस्य अनिकेत भोयर, संकेत भुरे, स्वप्निल आखाडे, सागर सहारे ,रोशन देशमुख, पवन नांदूरकर, स्वप्नील मोटघरे, स्वप्निल मर्जीवे, कुणाल माळोदे, मंगेश चंडनखेदे, जय शिंदे, निखिल,
दिव्या मस्के, मेघा देशमुख ,मिनल देशकर उपस्थित होते.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ