कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्र, खातेदारांना आर्थिक व्यवहासाठी अडचणी विनंती अर्ज
जावळी प्रतिनिधी सुनिल भोसले दि. 31 कुडाळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही सर्व पंचक्रोशीतील खातेदारांसाठी आर्थिक दृष्ट्या व्यवहार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बँक आहे. तरी खातेदार आपल्या शाखेत व्यवहार करण्यासाठी ये-जा करत असतात, परंतु त्यांचे आपल्या शाखेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचे समाधान होत नसल्याचे वारंवार आढळून येत आहे.
त्याबाबत खातेदार नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे कुडाळ मध्ये pay काऊंटर आणि रिसिव्ह काऊंटर एकच असल्याने, व मर्यादित कर्मचारी संख्या असल्यामुळे आर्थिक व्यवहार करने खातेदारांना अडचणीचे होत आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील खातेदार व कुडाळ येथील काही ग्रामस्थ आम्ही सर्वजण आपणास विनंती करीत आहोत. त्याचप्रमाणे वारंवार आपल्या शाखेकडून असे सांगितले जात आहे की, BSNL चा सर्वर प्रॉब्लेम येत आहे. जर असे असेल तर आपण त्यांच्याशी रीतसर बोलावे अथवा पत्रव्यवहार करावा. तसेच येत्या काही कालावधीमध्ये आपल्याकडून खातेदारांच्या समस्या सुटल्या गेल्या नाहीत तर आम्ही आपल्या संबंधित वरिष्ठांकडे आपल्या कडून होणाऱ्या गैरसोई बाबत लेखी निवेदन देणार आहोत. याची दखल बँक ऑफ महाराष्ट्रा कुडाळ कर्मचारी व मॅनेजर यांनी घ्यावी ही विनंती.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ