पेटो्ल,डिझेल व गॅस दरवाढीत अाता भाजीपाला सुध्दा शर्यतीत
कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
पेटो्ल,डिझेल व गॅसचे दर वाढने सुरु असताना अाता भाजी पाल्याच्या दराचे उच्चांक देखील गाठण्यास सुरुवात झाली अाहे.
भाजीपाल्यांचे दर १५०-२०० घरात जाऊन ठेपल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला महागईचा तडाका बसत अाहे. विविध कारणांमुळे वाढलेले भाजीपाल्याचे हे दर कमी होण्यास अाणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्याचे मत शेतकरी ,व्यापारी अाणि विक्रेते व्यक्त करत अाहेत.
गेल्या काही दिवसांत पेटो्लचा दर ११० रुपये,तर डिझेलचे दर १०० च्या घरात ठाण मांडून बसले अाहेत.पेटो्ल,डिझेलचे दर वाढले असतानाच घरगुती गॅस सिलिंडरने एकहजार रुपयांचा पल्ला गाठत सर्वसामान्यांचा खिसा मोकळा करण्यास सुरुवात केली.पेटो्ल,डिझेल अाणि गॅस दरवाढीमुळे कोलमडलेले बजेट सावरण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांकडून सुरु असतानाच भाजी पाल्याने,दररोज दराचे उच्चांक करण्यास सुरुवात केली अाहे.टोमॅटो,वांगी,पावटा,फ्लाॅवर,कोबी,गवारी,भेंडी,दुधी भोपळा,दोडका,यांच्या दराने शंभरी अोलांडली.मंडईतील भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे दर एेकून सर्वसामान्यांचे तोंडचे पाणी पळाले.
मध्यंतरीच्या काळात झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर अचानक वाढलेली थंडी,धुक्यामुळे पिकावर पडणार्या रोगांत झालेली वाढ,वाढलेले इंधन दर,त्यामुळे वाढलेले वाहतूकीचे दर,तोडणी,भरणीचे वाढलेले दर,मजूर कमतरतेमुळे शेतमालाची अावक घटली अाहे. अावक घटल्याने तसेच गरजे इतका शेतमाल शेतात शिल्लक नसल्याने मालाचे दर वाढले असून ते कमी होण्यास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो,असे विक्रेते,शेतकरी,व्यापारी सांगत अाहेत.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ