शासकीय मुलांचे वरिष्ठ बालगृह,केळकर वाडी येथे संकल्प महिला मंच द्वारे ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम घेण्यात आला.कडाक्याच्या थंडीत मुलांकरिता उबदार पांघरूनाची आवश्यकता लक्षात घेवून संकल्प महिला मंच द्वारे निरीक्षण गृहातील सर्व बालकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित बालकांना मौलिक मार्गदर्शन करून त्यांच्यासोबत हितगुज साधून त्यांच्या भविष्य कालीन वाटचालीस शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या . ,
संकल्प महिला मंच अध्यक्षा आणि नालवाड़ी येथील ग्राम पंचायत सद्स्य प्रतिभा वाळके यांच्या तर्फे ब्लैंकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संकल्प मंचच्या अध्यक्षा प्रतिभा वाळके, पदाधिकारी रोहिणी बाबर, ज्योती देवतारे, तसेच बाल समिती सदस्य एडव्होकेट नीना वन्नलवार , अधीक्षक किशोर खड़गी सर, मस्के सर, राठौड़ सर यांचीही नियोजित कार्यक्रमात उपस्थिती होती.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ