IHRA News

IHRA Live News

माझी वरपर्यंत ओळख आहे.”११ लाखांनी आरोग्य विभागात गंडविले

वर्धा२७ :- आरोपींचा शोध तातडीने सुरु रामनगर ठाण्यात तक्रार दाखल झाली,लिपिक आरोग्य सेवकपदासाठी अर्ज केलेल्या युवकाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळवून तब्बल ११ लाख रुपयांना दोघांनी गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली आहे. सुरज प्रमोद आगे, रा. म्हाडा कॉलनी याने सायबर कॅफेतून लिपिक आरोग्यपदासाठी नोकरीबाबत अर्ज भरला होता. सुरजचा मामा तुकाराम बुचे यांना आरोपी अनिता सचिन वंजारी ऊर्फ अनिता अंबादास देशमुख हिने “मी आरोग्य विभागात नोकरीवर असून पैसे घेऊन लावून देतो, माझी वरपर्यंत ओळख आहे.”हे वाक्य वापरले .मग लगेच दुसऱ्या दिवशी तिने नोकरी लावण्यासाठी १२ लाख रुपये लागेल, असे सांगितले.

त्यानंतर, वेळोवेळी सुरजने अनिताला पैसे दिले. काही दिवसांनी नाशिक येथील रोशन प्रकाश पाटील याचा फोन आला आणि पुन्हा पैशांची मागणी करू लागला. सुरजने विचारणा केली असता रोशनने मला मंत्रालयात पैसे द्यावे लागतात. त्यानंतरच नोकरी लागेल, असे म्हटले असता पुन्हा सुरजने पैसे (R T G S )द्वारे पाठविले. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही
नोकरी न लागल्याने सुरजने विचारपूस केली असता “तुमचे पैसे विसरून जा” असे उत्तर देण्यात आले.
काही दिवसांनी सुरजला ११ लाख रुपयांचा धनादेश देत बँकेतून पैसे काढून घ्या, असे सांगण्यात आले. सुरज हा बँकेत पडताळणीसाठी गेला असता आरोपीच्या खात्यात केवळ २८ रुपयेच शिल्लक असल्याचे समजले. सुरजला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने न्यायालयात दाद मागितली.अखेर, न्यायालयाच्या आदेशावरून रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपींचा शोध रामनगर पोलीस घेत आहे.

0Shares
error: Content is protected !!