IHRA News

IHRA Live News

जिल्हा पुरवठा कार्यालय, वर्धा येथे “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा

ग्राहक दिन मोठया उत्साहाने साजरा
ग्राहक चळवळ शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवा…..अजय भोयर

वर्धा२५ :- प्रतिनिधी/ दिपाली चौहान
दि, २४डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा पुरवठा कार्यालय, वर्धा येथे “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री अजय भोयर (सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद) तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्रीमती खणके ,सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शिवचरण मिश्रा(अध्यक्ष ग्राहक पंचायत वर्धा तालुका) ,श्री किशोर मुटे (अखिल भारतीय ग्राहक पंचायत ), श्री भाऊराव काकडे (अध्यक्ष,ग्राहक पंचायत) हे सगळे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, उपविभागीय अधिकारी,श्री सुरेश बगळे साहेब होते, कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धाचे अध्यक्ष पाटील साहेब ,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,त्यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कल्याणी मुटे यांनी ग्राहक गायन म्हणून कार्यक्रमाची सुरवात अतिशय सुंदर रित्या केली. प्रस्ताविक मा.श्री अरुण सहारे यांनी मांडले.प्रत्येक मान्यवरांनी ग्राहक दिना विषयी अतिशय उत्कृष्ट भाषण दिले .व मा. बगळे साहेबांनी या दिनाबद्दल महत्व सुद्धा जनतेला समजून सांगितले. तसेच अजय भोयर सरांनी त्यांच्या भाषणातून प्रत्येक व्यक्तीला जागरूक होण्याची गरज आहे.यामुळे कोणताच दुकानदार ग्राहकाची फसवेगिरी करणार नाही. तसेच ग्राहक चळवळ शेवटच्या घटका पर्यंत पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली .कार्यक्रमाचे अतिशय उत्तम नियोजन श्री रमेश बेडे ,जि.पु.अधिकारी यांनी केली होती, सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी निस्ताने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रमेश कोळपे ,तहसीलदार ,वर्धा यांनी व्यक्त केले.यावेळी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद च्या अध्यक्ष मा उषाताई फाले, मा वनमाला चौधरी,मा.श्री स्वप्नील मानकर, मा. दिपाली चौहान, सोनाली भोयर,सागर घाटे ,सागर दुबे, आदेश राठोड इत्यादी सह मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!